निवृत्तीवेतनधारकांसाठी डिजिटल हयातीचा दाखला सादर करण्यासाठी विशेष कार्यशाळांचे आयोजन
सातारा 13 : राज्य शासनाचे निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना केंद्र शासनाच्या ‘जीवन प्रमाण’ पोर्टलद्वारे डिजिटल लाइफ सर्टिफिकेट प्रणालीचा वापर करून दि. ३० नोव्हेंबरपर्यंत हयातीचे दाखले सादर करणे सोयीचे व्हावे, यासाठी सातारा कोषागार कार्यालयामार्फत जिल्ह्यातील विविध उपकोषागार कार्यालयांमध्ये विशेष कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे.
१ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत सर्व निवृत्तीवेतनधारकांना डिजिटल पद्धतीने हयातीचे दाखले देण्याचे आवाहन केंद्र शासनाच्या स्तरावरून करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पोर्टलवरील नोंदणी आणि वापराबाबत मार्गदर्शन करण्यासाठी पुढीलप्रमाणे तालुकास्तरीय कार्यशाळा होणार आहेत:
१६ नोव्हेंबर २०२६ रोजी उपकोषागार कार्यालय, फलटण, १७ नोव्हेंबर २०२६ रोजी उपकोषागार कार्यालय, कोरेगाव, १८ नोव्हेंबर २०२६ रोजी उपकोषागार कार्यालय, वाई , १९ नोव्हेंबर २०२६ रोजी उपकोषागार कार्यालय, मेढा (मेढा व महाबळेश्वर येथील निवृत्तीवेतनधारकांसाठी), २० नोव्हेंबर २०२६ रोजी उपकोषागार कार्यालय, वडूज (सकाळी ११.०० वाजता) आणि उपकोषागार कार्यालय, दहिवडी (दुपारी २.३० वाजता)
संबंधित तालुक्यातील राज्य शासनाच्या निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी (स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवृत्तीवेतनधारक वगळून) या कार्यशाळेस सकाळी ठीक ११ वाजता मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी आरती नांगरे यांनी केले आहे.



