जनगणना २०२७ अंतर्गत दुसऱ्या टप्यातील प्रशिक्षणाचे आयोजन
सातारा दि- १३ जनगणना २०२७ च्या पुर्वतयारीसाठी दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणाचे आयोजन दि. १६ ते १७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे करण्यात आले आहे.
हे प्रशिक्षण डॉ नितेश पराशर, एसआर, ओ मॅप, जनगणना संचालनालय मुंबई व विशाल दिवेकर, एस आय (२) जनगणणा संचालनालय मुंबई यांचे मार्फत जिल्हयातील सर्व चार्ज अधिकारी तथा तहसिलदार व मुख्याधिकारी, उपविभागीय अधिकारी, चार्ज अधिकारी यांचेकडील संबंधित कर्मचारी व तांत्रिक सहायक यांना दिले जाणार आहे, असे जिल्हा जनगणना अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी सातारा नागेश पाटील यांनी कळवले आहे.



