सातारा शहरातील शहा कुटुंबियांच्या म्हसवडकर ड्रेसेस दालनाचा भव्य शुभारंभ
सातारा : सातारा शहरातील म्हसवडकर ड्रेसेस सर्वात जुने दुकान आहे. म्हसवडकर ड्रेसेस म्हणजे एकाच छताखाली सर्वच प्रकारच्या कपड्यांचे दालन. या भव्य दालनाचा शुभारंभ मंगळवार दिनांक 18 जून रोजी मोठ्या दिमाखात पार पडला.
नवीन वास्तूचा शुभारंभ डॉ.अनिल हिराचंद शहा यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी डॉक्टर विजय हिराचंद शहा, सुनील शहा, सौ रुपा शहा, पुष्पक शहा, पायल शहा, सिद्धांत शहा, श्रेणिक शहा यांची प्रमुख उपस्थिती होती. म्हसवडकर ड्रेसेसला जवळपास 75 वर्षे झालेली आहेत.
म्हसवडकर ड्रेसेस च्या नवीन दालनामध्ये मॅचिंग सेंटर साडी विभाग, रेडीमेड विभाग, शर्टींग शूटिंग विभाग, लहानांसाठी स्पेशल चिल्ड्रन विभाग आहे. दिनांक 18 जून 2024 पासून सातारा शहरातील नागरिकांसाठी पूर्णपणे अत्याधुनिक दालन सुरू झाले आहे.