सत्कार सोहळा..सर्वसामान्य कुटुंबातील जिद्दीचा..!‘आकाशाला’ गवसणी घालणाऱ्या ‘आकाशचा’..!!
भुईंज :- (महेंद्रआबा जाधवराव) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC-2023) घेण्यात आलेल्या परीक्षेमधून इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस (IFS) पदी निवड झाल्याबद्दल वेळे (कामठी ) ता. जि. सातारा येथील सुपुत्र चिं.आकाश सुषमा धनाजी कदम (ऑल इंडिया रैंक ७६ भारतीय वन सेवा) यांचा जाहीर सत्कार जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांचे शुभहस्ते तसेच विभागीय वन अधिकारी आदिती भारद्वाज व अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे.
शनिवार दि. २९ जून २०२४ रोजी सकाळी १० वाजता सातारा एस. टी. स्टॅन्डच्या मागील बाजूस असलेल्या निर्मल मंगल कार्यालयात होणाऱ्या या सत्कार समारंभास सर्वांनी उपस्थित राहावे असे मंत्रालयीन कक्ष अधिकारी कु. कावेरी कदम, धनाजी कदम, जि. प. व जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रतीक कदम व रवींद्र कदम यांनी केले आहे.
सातारा तालुक्यातील वेळे कामथी गावचा सुपुत्र आकाश हा कोल्हापूर येथील विद्या प्रबोधिनीतर्फे देण्यात येणाऱ्या चंद्रकांत पाटील स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्तीचा विद्यार्थी आहे.
त्याने युपीएससीने घेतलेल्या इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे. भारतीय वन सेवा ही आयएएस व आयपीएससारखी ऑल इंडिया सर्व्हिस असून, भारतातील वन संरक्षण आणि संवर्धन, वन कायद्यांच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाची सेवा मानली जाते.
वेळे कामथी ता. जि.सातारा येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील धनाजी उर्फ अशोक कदम व प्रा.आ.केंद्र लिंब येथे आरोग्य सेविका पदावर कार्यरत असलेल्या सौ. सुष्मा कदम यांचा सुपुत्र आकाश कदम याने अतिशय अवघड असणाऱ्या (UPSC ) संघ लोकसेवा आयोग २०२३ च्या IFS इंडियन फॉरेस्ट ऑफीसर या पदाला पहिल्याच प्रयत्नात आकाशने आकाशाला गवसणी घातली आहे.
कष्ट, जिद्द, ध्येय व चिकाटीच्या जोरावर आकाश सुपर क्लास वन अधिकारी झाला याचा सार्थ अभिमान कदम कुटुंबाला आहे. नगर विकास मंत्रालयात प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेली आकाशची मोठी बहीण कु. कावेरी हिची मिळालेली मोलाची साथ व ध्येय गाठण्यासाठी दिलेली हाक
ख-या अर्थाने सार्थ झालीय.
तसेच आज्जीने लहानपणी दिलेली शिकवण, मोठ्या बहिणीचे मार्गदर्शन आणि आई-वडिलांनी दिलेले चाकोरीबद्ध शिक्षण यामुळेच “आकाशाला” उत्तुंग गवसणी घालता आल्याचा सार्थ अभिमान सर्वसामान्य कुटुंबातील ‘आकाशला’ वाटत आहे.