महाबळेश्वर मध्ये पिसोरी हरणाची शिकार वनविभागाची कारवाई
महाबळेश्वर -दि. ०७.०४.२०२४ रोजी सहाय्यक वनसंरक्षक, सातारा, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) महाबळेश्वर, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) मेढा व इतर वनकर्मचारी हे सामुहिक रात्र गस्त करित असताना मोळेश्वर फाटा ते सहयाद्री नगर (राजमार्ग रस्ता) रस्त्यावर राखीव वनातील फॉ. कं.नं. २८४ मध्ये दोन संशयित इसम रस्त्यावर आढळून आल्याने त्यांची चौकशी व तपास केला असता त्यांच्या जवळ पिशवी आढळून आली. पिशवी मध्ये वाघर, कोयता, काडतुस इ. वस्तु सापडल्याने ते इसम शिकारी असल्याचा संशय बळावला. त्यावरुन त्यांची कसून चौकशी केली असता इतर दोन आरोपींचा शिकारी मध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले त्यावरुन सदरच्या आरोपी यांचेकडून शिकारीसाठी वापरण्यात आलेली गावठी बंदुक व बंदुकीने मारलेले पिसोरी (Mouse Deer) व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. आरोपींची नांवे खालीलप्रमाणे-शिवाजी चंद्रकात शिंदे, दिपक शंकर शिंदे,गणेश कोंडिबा कदम आदित्य दिपक शिंदे,
वरील चारही आरोपींवर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ चे कलम ९,३९,५० व ५९ नुसार कारवाई करण्यात आली. सदरची कारवाई सातारा वन विभागाच्या उपवनसंरक्षक मा.श्रीमती. आदिती भारद्वाज, भा.व.से. यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. महेश झांजुर्णे, सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण) सातारा, श्री. गणेश महांगडे, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) महाबळेश्वर, श्री. अर्जुन गंबरे, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) मेढा, श्री. निलेश रजपूत वनपाल बामणोली, श्रीमती. अर्चना शिंदे वनपाल तापोळा श्री. रमेश गडदे वनरक्षक मांघर, श्री. अभिनंदन सावंत वनरक्षक महाबळेश्वर, श्री. लहू राऊत वनरक्षक क्षेत्रमहाबळेश्वर, श्री. स्वप्नील चौगुले वनरक्षक मेढा, श्री. राहुल धुमाळ वनरक्षक बामणोली, श्रीमती स्नेहल शिंगाडे वनरक्षक केळघर, श्रीमती संगिता शेळके वनरक्षक भामघर, श्री. संदीप पाटोळे वनरक्षक कळमगांव यांनी सदरची कार्यवाही पार पाडली. पुढील तपास श्री. गणेश महांगडे, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) महाबळेश्वर करीत आहेत.