कूपर उद्योग समूहाच्या माध्यमातून कामगार पश्चात कुटुंबियांना आर्थिक मदत
कूपर उद्योग समूहामध्ये सतत नावीण्यपूर्ण व कल्याणकारी उपक्रम, योजना कामगार कर्मचा-यांसाठी राबविण्यात येतात त्याचाच एक भाग म्हणजे नरीमन कूपर ट्रस्टच्या माध्यमातून राबविण्यात येणारे विविध उपक्रम जे इतर कोणत्याही कंपनीत राबविले जात नाहीत .
कूपर उद्योगाने नरीमन कूपर कुटुंब कल्याण आणि विकास विश्वस्थ संस्था स्थापन करून या माध्यमातून कार्यरत असणा-या कामगार व कर्मचारी त्यांचे कुटुंबिय यांसाठी आर्थिक पाठबळ दिले आहे. कामगार कर्मचारी पगारातून निधी प्रती माह ठराविक रक्कम जमा करतात व कामगार, कर्मचारी यांच्या एकूण रक्कमे इतकी रक्कम कंपनी जमा करते.
कूपर कॉर्पोरेशनची सदर ट्रस्ट ही कामगार व कर्मचारी यांच्या कुटुंबियांसाठी कल्याणकारी आर्थिक, मदतीचे व विकासात्मक उपक्रम राबवित असते जसे की, माध्यमातून मयत कामगार व कर्मचारी यांच्या कुटुंबियांना त्यांच्या पश्चात पत्नी, मुले व आई वडिल यांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी ट्रस्टच्या माध्यमातून एक रक्कमी सहा लाख रूपये आर्थिक मदत केली जाते. सदर मदत ही कामगार व कर्मचारी यांच्या पगारातून प्रत्येकी दोनशे रूपये प्रमाणे ट्रस्टमध्ये जमा करून तेवढीच रक्कम कंपनी ट्रस्टला देऊन एकूण आर्थिक एक रक्कमी रक्कम मयत व्यक्तीच्या कुटुंबियांना ट्रस्टच्या माध्यमातून देण्यात येते.
नुकतेच सदर आर्थिक मदत कै अमित साहेबराव ढाणे, कै कुंडलिक श्रीरंग शेडगे, कै. युसुफअली बशिर शेख, कै. कालिदास श्रीरंग जाधव, कै. शंकर आनंदराव घाडगे, कै. सुनिल रामचंद्र ढाणे यांच्या कुटुंबियांना ट्रस्टच्या माध्यमातून एक रक्कमी आर्थिक मदत केली गेलेली आहे. ही आर्थिक मदत देताना मयत कामगारांच्या कुटुंबियांतील सदस्यांचा भविष्यातील आर्थिक गरजांचा विचार करून दिली जाते.
तसेच ट्रस्टच्या माध्यमातून सदस्य कामगार व कर्मचारी यांच्या आजारपणी त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना दवाखान्याचा वैद्यकिय कमाल एक रक्कमी दोन लाखाची आर्थिक मदत ही त्या आजारातील खर्चानुसार देण्यात येते. सोबतच कामगार व कर्मचारी यांच्या गुणवंत पाल्यांना ट्रस्टच्या माध्यमातून वार्षिक स्कॉलरशिप तसेच वर्षातून पाल्यांसाठी त्यांच्या कला गुणांना वाव देण्याच्या उद्देशाने उन्हाळी व हिवाळी शिबीराचे आयोजन केले जाते कूपर उद्योग समूहातील सदर ट्रस्ट ही नक्कीचं उद्योग क्षेत्रात एक आगळावेगळा आपला स्वतः असा ठसा उठवून लौकीक मिळवत आहे.