प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ गौरव शेटे सातारा डायग्नोस्टिक सेंटरमध्ये उपलब्ध
सातारा, दि. 18ऑगस्ट 2024 : महिला रुग्णांमध्ये वंध्यत्वाच्या समस्यांसाठी वंध्यत्व निवारण व त्यावरील उपचार यामध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेले स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. गौरव शेटे उद्या (19ऑगस्ट ) व 20ऑगस्ट रोजी सातारा डायग्नोस्टिक सेंटर येथे रुग्णांसाठी उपलब्ध असणार आहेत.
डॉ. गौरव शेटे हे पनवेल (मुंबई) येथील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ असून ते एमबीबीएस. ,एम.एस. (गायनिक), फेलोशिप प्रोस्कोपी असे उच्चशिक्षित आहेत.
स्त्रियांची गरोदरपणातील आणि गरोदरपणानंतर घ्यावयाची काळजी, स्त्रीरोग विशेषत: वंध्यत्व आणि उपचार, कर्करोगाची तपासणी, रजोनिवृत्तीची काळजी, थ्री डी लॅप्रोस्कोरपी, थ्री डी सोनोग्राफी,आय. व्ही. एफ. टेस्ट ट्यूब बेबी, अनियमित मासिक पाळी, अनियमित रक्तस्त्राव, जन्म नियंत्रण याविषयांचे ते तज्ज्ञ डॉक्टर आहेत.
ज्या महिला रुग्णांना वंध्यत्वाच्या समस्या असतील त्यांनी वंध्यत्व निवारण व त्यावरील उपचार यामध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेले डॉ. गौरव शेटे यांच्या भेटीचा लाभ घ्यावा. डॉ. शेटे दि. रोजी19/8/2024 व दि.20/8/2024 रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत सातारा डायग्नोस्टिक अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपलब्ध असतील. रुग्णांनी श्रीकांत देशमुख, मोबा. ९१६८४३२४३२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सातारा हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक डॉ. सुरेश शिंदे यांनी केले आहे.
