Home » राज्य » शिक्षण » गौरीशंकर इन्स्टिट्यूटचे डॉ संतोष बेल्हेकर याचे संशोधन क्षेत्रात उत्तुंग कामगिरी

गौरीशंकर इन्स्टिट्यूटचे डॉ संतोष बेल्हेकर याचे संशोधन क्षेत्रात उत्तुंग कामगिरी

गौरीशंकर इन्स्टिट्यूटचे डॉ संतोष बेल्हेकर याचे संशोधन क्षेत्रात उत्तुंग कामगिरी

औषधनिर्माण क्षेत्रात स्टुडंट ऑर्गन बाथ आधुनिक उपकरणाची निर्मिती भारत सरकारचे पेटंट प्राप्त..

लिंब-औषधनिर्माण शास्त्र क्षेत्रातील नविण्यपूर्ण नवसंशोधनाचा ध्यास घेवून नवनिर्मितीचे स्वप्न साकार करण्यासाठी सातत्याने नवे नवे प्रयोग करणारे गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल ऐज्युकेशन अँड रिसर्च लिंब महविघालयातील तज्ञ प्रा. डॉ संतोष बेल्हेकर यानी नवसंशोधन करून बनविलेल्या अत्याधुनिक स्टुडंट ऑर्गन बाथ या उपकरणाची दखल भारत सरकारच्या पेटंट कार्यालय नवी दिल्ली यांनी घेवून त्याच्या या उपकरणाला पेटंट देवून गौरविले आहे. त्याच्या या नवसंशोधन उपकरणाचा लाभ नवसंशोधक व शास्त्रज्ञाना होणार आहे प्रयोगशाळेतील बिनचूक प्रयोगासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरणाऱ्या या उपकरणामुळे. औषधनिर्माण शास्त्र शाखेत मोठी क्रांती होणार आहे. डॉ संतोष बेल्हेकर याचा प्रदीर्घ अनुभव यासाठी कामी आला आहे त्याचप्रमाणे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पेपर प्रेझेटशन व शोधनिबंध हि प्रसिध्द झाले आहेत. मानवी शरीरातील विविध आजारावर परिणामकारक औषधनिमिती करताना प्रथम या औषधाची चाचणी व तपासणी प्राण्याच्या विविध अवयवावर केली होती या प्राण्यावर केलेल्या चाचण्याच्या सकारात्मक परिणामाच्या आधारे संशोधक मानवी शरीरातील विविध अवयवावर अचूक औषधनिर्मिती करीत असतात अर्थात औषधनिर्मिती करताना त्यासाठी आवश्यक असणार्‍या उपकरणाचे हि तितकेच या क्षेत्रात महत्व आहे .

प्रयोगशाळेत रसायनाचे अचूक मोजमापाच्या साहय्यानेच अचूक औषधनिर्मिती होते यासाठी वापरण्यात येणार्‍या उपकरणाचे मोल अनमोल असते. याचे महत्व ओळखून डॉ संतोष बेल्हेकर यानी बनविलेले नविन्यपूर्ण उपकरण औषधनिर्मिती क्षेत्राला नवीदर्शक ठरणार आहे. त्याच्या नवसंशोधनाचे सर्वस्तरातून डॉ संतोष बेल्हेकर याचे कौतुक होत आहे. त्याच्या उचित कार्याबदल त्याचा गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँण्ङ रिसर्च लिंब महविद्यालयात संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर याच्या हस्ते डॉ संतोष बेल्हेकर याचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी महविद्यालयाचे प्राचार्य डॉ योगेश गुरव, डॉ भूषण पवार, डॉ धैर्यशील घाङगे ,प्रा दुधेश्र्वर क्षिरसागर, प्रा शुभम चव्हाण अदि प्रमुख उपस्थित होते.

याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर म्हणाले कि संबोधन क्षेत्रात नवनिर्मिती करुन उतुंग कामगिरी करणार्‍या डॉ संतोष बेल्हेकर याच्या संशोधनात्मक कार्याचा आम्हाला अभिमान वाटतो. त्यानी घेतलेले परिश्रमाचे अखेर सार्थक झाले.

प्राचार्य डॉ योगेश गुरव म्हणाले कि गौरीशंकरचे प्रा डॉ संतोष बेल्हेकर यानी संशोधन करुन आधुनिकतेने बनविलेले स्टुडंट ऑर्गन बाथ या उपकरणातून औषधनिर्माण क्षेत्रातील नवनिर्मितीला चालना मिळणार आहे.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय देशमाने व आभार प्रा.स्नेहल सावंत.यांनी मानले

डॉ संतोष बेल्हेकर यांनी प्राप्त केलेल्या यशाबद‌ल संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप, उपाध्यक्ष मिलिंद जगताप, संचालक डॉ अनिरूद्ध जगताप, जयवंतराव साळुंखे, आप्पा राजगे, प्रशासकिय अधिकारी नितीन मुङलगीकर कायदेशीर मॅनेजर रवि जगताप यांनी अभिनंदन केले.

– मज्जासंस्थेतील परस्पर संवाद अणि हृदयाचा किंवा स्नायूंच्या आकुंचनाची तपासणी करण्यासाठी औषधशास्त्र द्वारे स्टुडंट ऑर्गन बाथ अनेक दशकापासून वापरली जात आहे हे एक अष्टपैलू उपकरण आहे. ज्याचा उपयोग संशोधकानी हृदय फुफ्फुस किंवा आतड्यासारख्या वेगळ्या अवयवावर औषधचा कसा परिणाम होतो हे तपासण्‌यासाठी केला जातो. औषधे कसे कार्य करतात आणि औषधाच्या स्नायूच्या आंकुचनशीलतेचा अभ्यास करण्यासाठी हे उपकरण उपयुक्त आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सह्याद्रि कारखान्यासाठी तिरंगी लढत; 21 जागांसाठी 70 उमेदवार निवडणूक रिंगणात

Post Views: 33 सह्याद्रि कारखान्यासाठी तिरंगी लढत; 21 जागांसाठी 70 उमेदवार निवडणूक रिंगणात सह्याद्रि सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारी

Live Cricket