दिशाच्या १७ विद्यार्थ्यांची सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्था आयआयटी मध्ये निवड
जेईई ॲडव्हान्स परीक्षा २०२४ च्या निकालात दिशा ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. जेईई ॲडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण झालेल्या एकुण ४८ विद्यार्थ्यांपैकी १७ विद्यार्थ्यांची निवड भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात IIT मध्ये झाली आहे. ही टक्केवारी जवळपास ३५ टक्के आहे. भारत सरकारच्या अखत्यारीत असलेल्या आणि भारताच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला हातभार लावण्यासाठी कुशल कार्यबल विकसित करण्याच्या उद्देशाने शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांना प्रशिक्षण देण्यासाठी IITs या सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्था गणल्या जात असल्याने दिशाच्या विद्यार्थ्यांची झालेली निवड ही महत्वपूर्ण आहे.
पुर्वा पवार, आर्यन राज, शंतनू मोरे, यश निकम, यशराज साळुंखे, अर्थव अडसुळ, हर्ष राज, रोशन कुमार, मृणाल भारती, श्रेयस कातुळे, अनुराग कुमार, कौशल राज, यजुवेंद्र रणावरे, सृजल सामंत, अर्थव चौधरी, धमदिक्षा जाधव, गौरव कुमार या १७ विद्यार्थ्यांची निवड आयआयटीमध्ये झालेली आहे. निवड झालेल्या या विद्यार्थ्यांची भव्य मिरवणूक काढत दिशा ॲकॅडमीने आनंदाची आतीषबाजी केली आहे.
या निवडीबद्दल बोलताना दिशा ॲकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन कदम म्हणाले; चांगल्या शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश मिळाल्याने या विद्यार्थ्यांचा भविष्यातील मार्ग अधिक सोपा होणार आहे, भविष्यातील अडचणींवर मात करण्यासाठी अनेक गोष्टींचे ज्ञान या संस्थामध्ये मिळेलच शिवाय भविष्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याबरोबरच चांगला व्यक्ती घडवण्यातही IIT संस्थेचा मोलाचा वाटा असणार आहे. ११वी १२ वीची तयारी करताना दिशाने करून घेतलेली स्पर्धा परीक्षेची तयारी या प्रवासात मोलाची ठरली आहे. आमच्या तज्ञ शिक्षकांची शिकवण्यातील तळमळ आणि विद्यार्थ्यांची मेहनत खऱ्या अर्थाने विजयी झाली आहे.
आयआयटी सारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये आपली प्रतिभा दाखवण्याची, कौशल्ये विकसित करण्याच्या संधीचा पुरेपुर फायदा दिशाचे विद्यार्थी करून घेतील असा विश्वास व्यक्त करत, दिशाच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रा. रूपाली कदम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
दिशा ॲकॅडमीतील प्राध्यापकांप्रमाणेच आयआयटी देखील विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करत संशोधताही सर्वोच्च स्थानी नेतील. भविष्यात आमचे विद्यार्थी उत्तम करिअर घडवतील असे सांगत, दिशाचे शिक्षण विभाग प्रमुख सतीश मौर्य यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. दिशा ॲकॅडमीतील शिक्षक, कर्मचारी, पालक व समाजातील विविध स्तरातून आयआयटी मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि कौतुक होत आहे.