Post Views: 7
मधुकरशेठ मोतीराम देवकर पाटील यांची राष्ट्रीय काँग्रेस पार्टी खटाव तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार समारंभ
पुसेगाव प्रतिनिधी ( नानासो चन्ने )बनपुरी ता. खटाव येते भव्य नागरी सत्कार समारंभ मंगळवार दि:16/07/24रोजी आयोजित केला आहे.सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे बनपुरी गावचे सुपुत्र मा.श्री मधुकर शेठ मोतीराम देवकर – पाटील यांची राष्ट्रीय काँग्रेस पार्टी खटाव तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भव्य नागरी सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित केला आहे कार्यक्रम श्री मधुकरराव पाटील सांस्कृतिक भवन का. खटाव येथे संपन्न होणार असुन ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा.रणजित(भैय्या) देशमुख तसेच राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आणि पंचक्रोशीतील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.