Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » शिवराज्याभिषेक दिना निमित्त प्रदीपदादा मित्र परिवाराच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात 73 रक्तदात्यांचे रक्तदान केले.

शिवराज्याभिषेक दिना निमित्त प्रदीपदादा मित्र परिवाराच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात 73 रक्तदात्यांचे रक्तदान केले.

शिवराज्याभिषेक दिना निमित्त प्रदीपदादा मित्र परिवाराच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात 73 रक्तदात्यांचे रक्तदान केले.

कराड – तांबवे (ता. कराड) येथील प्रदीप दादा मित्र परिवाराकडून शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. सलग पाचव्या वर्षी आयोजित शिबिरात 73 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

प्रदीप दादा मित्र मंडळ कडून आयोजित शिबिराचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य आणि रयत कारखान्याचे संचालक प्रदीप पाटील, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक सुरेश देसाई, शिक्षण विस्तार अधिकारी जमिला मुलाणी, माजी प्राचार्य तात्यासाहेब पाटील, गुणवंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. रक्तदान शिबिरात गट विकास अधिकारी प्रताप पाटील, पाणीपुरवठा उपअभियंता प्रताप पाटील यांनी रक्तदान केले. या शिबिरास तहसीलदार विजय पवार, पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी भेट दिली. रक्तदान शिबराच्या ठिकाणी सेल्फी पॉइंट उभारण्यात आला होता.

अमोल ठाकूर म्हणाले, सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून रक्तदान शिबिराचा उपक्रम स्तुत्य आहे. युवकांकडून शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सलग पाचव्या वर्षी हा उपक्रम राबवत असल्याने चांगली गोष्ट आहे. पुढे अशाच प्रकारे सामाजिक बांधिलकी प्रदीप दादा मित्र परिवारांनी जपावी.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket