Home » देश » कृषि आयुक्त यांची वाई येथे कृषि प्रक्रिया उद्योगास भेट

कृषि आयुक्त यांची वाई येथे कृषि प्रक्रिया उद्योगास भेट

मा.आयुक्त कृषि यांची वाई येथे कृषि प्रक्रिया उद्योगास भेट

वाई प्रतिनिधी –वाई येथे महाराष्ट्र राज्याचे कृषि आयुक्त मा. डॉ. प्रवीण गेडाम साो. यांनी खरीप हंगामाच्या पार्श्वभुमीवर साताराजिल्ह्यास भेट दिली. सदर भेटी दरम्यान त्यांनी वाई एम. आय. डी. सी. येथील ऑर्चर्ड ब्रँड प्रा. लि. या कृषि प्रक्रिया उद्योगास भेट दिली. कंपनीचे व्यवस्थापक श्री.ऋषिकेश शिंदे यांनी फळे व भाजीपाला यांच्यावर थंड निर्वात प्रक्रिया केली जात असुन फळांचे व भाजीपाल्याचे मुळगुणधर्म व जीवनसत्व कायम राहुन सर्व फळपिकांच्या ड्राय फ्रोजन केलेल्या पदार्थांविषयी माहिती सांगितली तसेच अशा हलक्या व गुणवत्तापुर्ण उत्पादित प्रक्रिया पदार्थास आईस्क्रीम, शितपेय, हवाई प्रवास चॉकलेट,रेल्वे कॅन्टिन व हॉटेल्स मध्ये मागणी व निर्यातीस वाव असल्याचे सांगितले.शेतकऱ्यांच्या गुणवत्ता पुर्ण शेतमालास उच्चतम बाजार पेठ मिळण्याची संधी अशा प्रक्रिया उद्योगाने निर्माण होवुन. त्यातुन मिळणाऱ्या नफ्याचे व रोजगाराचे प्रमाण मोठे असल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना निश्चितच होईल असे महाराष्ट्र राज्याचे कृषि आयुक्त मा. डॉ. प्रवीण गेडाम साो. यांनी सांगितले. व शेतकरी बांधव व कृषि विभाग यांना खरीप हंगाम यशस्वीतेच्या शुभेच्छा दिल्या.

माननीय श्रीमती भाग्यश्री फरांदे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा यांनी हळद पिकाच्या गुणवत्तापुर्ण नमुन्यांची व विविध वानांची माहिती दिली. व सातारा जिल्हयातील विविध कृषि प्रक्रिया उद्योगाविषयी माहिती सांगितली.सदर भेटी दरम्यान श्री. प्रशांत शेंडे, तालुका कृषि अधिकारी, वाई यांनी तालुक्यामध्ये होत असलेल्या पिकांची व कृषि प्रक्रिया व हळद उद्योगाविषयी माहिती सांगितली.

सातारा जिल्ह्यातील सर्व भेटींचे नियोजन हे माननीय श्री. बसवराज बिराजदार साो. विभागीय कृषि सहसंचालक कोल्हापूर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.सदर भेटी दरम्यान माननीय श्री. बसवराज बिराजदार साो. विभागीय कृषि सहसंचालक कोल्हापूर,मा.श्रीमती भाग्यश्री फरांदे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा, मा. श्री. विकास बंडगर साो. प्रकल्प संचालक आत्मा, सातारा, मा. श्री. फिरोज शेख, जिल्हा नोडल अधिकारी, स्मार्ट प्रकल्प, मा. श्री. प्रशांत शेंडे, तालुका कृषि अधिकारी, वाई व वाई तालुक्यातील सर्व कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी वाई व मेणवली, तसेच कृषि पर्यवेक्षक वाई, कृषि सहाय्यक व आत्मा बी. टी. एम. व ए.टी.एम. हे उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket