Home » ठळक बातम्या » एफिनिटी-एक्स पुणे आणि उर्मी संस्था पुणे या संस्थेमार्फत महाबळेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना साहित्याचे वाटप

एफिनिटी-एक्स पुणे आणि उर्मी संस्था पुणे या संस्थेमार्फत महाबळेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना साहित्याचे वाटप

एफिनिटी-एक्स पुणे आणि उर्मी संस्था पुणे या संस्थेमार्फत महाबळेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना साहित्याचे वाटप

 महाबळेश्वर -उर्मी संस्था पुणे आणि एफिनिटी-एक्स पुणे, यांच्या मार्फत महाबळेश्वर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये स्वेटर्स आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या साहित्याचे वाटप पंचायत समिती महाबळेश्वर यांच्यावतीने पंचायत समिती महाबळेश्वर येथे शाळांच्या प्रतिनिधींकडे कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला. 

 

यावेळी पंचायत समिती महाबळेश्वर गटविकास अधिकारी यशवंत भांड, गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे, विस्तार शिक्षण अधिकारी नामदेव धनावडे, केंद्रसंचालक जयराज जाधव, उर्मी संस्थेतर्फे राहुल शेंडे, संतोष जाधव आदि मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. 

पंचायत समिती महाबळेश्वर यांच्या संकल्पनेतून अतिदुर्गम भागातील ६८ शाळांमधील आणि अंगणवाड्यांमधील १०४३ गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना स्वेटर आणि शैक्षणिक साहित्य विविध संस्थांच्या माध्यमातून तथा लोकसहभागातून आणि दोनही संस्थांच्या माध्यमातून साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी साहित्य वाटप हे त्या शाळांमधे प्रत्यक्ष जाऊन करण्यात आले. याप्रसंगी शाळेवर जाताना बोटीतून प्रवास, तराफ्यातून प्रवास करण्यात आला, तसेच काही ठिकाणी डोंगर चढून शाळेत जाण्यात आले..त्यावेळी अतिदुर्गम शाळेत साहित्य मिळाल्याबद्दल सर्व विद्यार्थी,पालक व शिक्षक यांनी दोन्हीही संस्थेच्या प्रतिनिधींना धन्यवाद दिले.

या माध्यमातून महाबळेश्वर तालुक्यातील माचूतर केंद्रातील १० शाळा, मेटगुताड केंद्रातील १ शाळा, पारसोंड केंद्रातील १२ शाळा, शिरवली केंद्रातील ८ शाळा, लामज केंद्रातील १० शाळा, येरणे बु. केंद्रातील १३ शाळा, वेळापूर केंद्रातील ७ शाळा आणि वाळणे केंद्रातील ७ शाळांना साहित्य देण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना स्वेटर, ड्रॉइंग बूक, तेलखडू, रंगपेटी आणि खाऊचे वाटप करण्यात आले. 

माचूतर, मेटगुताड, पारसोंड आणि शिरवली केंद्रात एफिनिटी-एक्स पुणे या कंपनी तर्फे ओंकार दिवाण, अनिश शॉ, डोनाल्ड पिंटो उर्फ डॉन, उर्मी संस्थेतर्फे सुहास कन्हेरकर, गौरव खोपडे, आणि पंचायत समिती तर्फे मासूलकर व गवळी उपस्थित होते. 

      लामज आणि येरणे बु. केंद्रात एफिनिटी-एक्स पुणे या कंपनी तर्फे संतोष जाधव, प्रवीण हरगुडे, मनोरट कुमार, प्रवीण पाटील, धिरज गवळी, रुपेश शिंदे, उर्मी संस्थेतर्फे डॉ अमृत गुरुसाळे, सुनीता गुरुसाळे, सचिन गोडसे, अमोल माने, अनीता कापरे, रावी शेंडे, आणि पंचायत समिती तर्फे मिसाळ व शाम पाडवी उपस्थित होते.

 

वेळापूर आणि वाळणे केंद्रात एफिनिटी-एक्स पुणे या कंपनी तर्फे मयूर कदम, मोहित शेट्टी, स्नेहा कुमारी, शुभलक्ष्मी जगताप, श्रावणी घोष, काजल गिरी, आकाश सोकासणे, ललित बोंडे, रोहन धावडे, उर्मी संस्थेतर्फे राहुल शेंडे, राहुल चुणीदास, संदीप जाधव आणि पंचायत समिती तर्फे रवी मेमाणे, लोणकर व पोरे उपस्थित होते. 

सर्व साहित्य वितरणाची व्यवस्था व नियोजन जयराज जाधव, केंद्रप्रमुख विनायक पवार, राजेंद्र गोफणे, सुहास कुलकर्णी, कुलदीप अहिवळे, अभिजीत खामकर यांनी केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket