खासदार मा.श्री.नितीनजीकाका पाटील यांच्या हस्ते वाई फेस्टिवल २०२४ च्या सोहळा सांगता समारोपाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन
वाई फेस्टिवल २०२४ च्या सोहळ्याचा सांगता समारोप सोनी मराठी वाहिनीवरील हास्यजत्रेतील विनोदवीरांच्या उपस्थितीत संपन्न
वाई प्रतिनिधी -वाई फेस्टिवल २०२४ च्या सोहळ्याचा सांगता समारोप सोनी मराठी वाहिनीवरील हास्यजत्रेतील विनोदवीरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. २२ डिसेंबर २०२४ रोजी खासदार मा श्री नितीनजी काका पाटील यांच्या हस्ते या सांगता समारोपाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. सलग १७ वर्षे हा सोहळा सुरु राहणे हि अतिशय अवघड बाब आहे आणि यासाठी याचे आयोजन करणारे श्री अमर कोल्हापुरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे सर्व सहकारी व आयोजक संस्था उत्कर्ष पतसंस्था व वाई जिमखाना यांचे अभिनंदन खासदार श्री नितीनजी पाटील यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. आर बी आय चे निवृत्त अधिकारी मा श्री अविनाश जोशी सर यांना त्यांच्या पंच्याहत्तरी निमित्त व संस्थेप्रती असणाऱ्या त्यांच्या निष्ठेप्रति वाई फेस्टिवल च्या मंचावर मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच दरवर्षी उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वाई मधील आदर्श कर्मचाऱ्यास “ परफोर्मर ऑफ दि यिअर ” या पुरस्काराने सन्मानित केले जाते. यावर्षीचा हा पुरस्कार संस्थेतील कर्मचारी सौ रुपाली विनोद अडसूळ यांना मिळाला.
याप्रसंगी भुईंज गावचे उपसरपंच श्री शुभम पवार देखील उपस्थित होते. मान्यवरांच्या शुभहस्ते उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वाई च्या २०२५ च्या दिनदर्शिका चे प्रकाशन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरवात क्रांती नाना माळेगावकर यांच्या न्यु होम मिनिस्टर या “खेळ पैठणीचा” या कार्यक्रमाने झाली. महिलांनी या कार्यक्रमात सहभागी होवून मनमुराद आनंद लुटला व खऱ्या अर्थाने महिलांचे मनोरंजन वाई फेस्टिवल च्या माध्यमातून करण्यात आले. विजेत्या ३ महिलांना मान्यवरांच्या हस्ते पैठणी देण्यात आली.
प्रेक्षकांसोबत गप्पा मारण्यासाठी आलेल्या हास्यजत्रेतील कलाकार मा वनिता खरात व मा चेतना भट यांनीदेखील न्यु होम मिनिस्टर या खेळात सहभाग घेतला. त्यांच्यासोबत आलेले कलाकार श्री निखील बने, मंदार मांडवकर यांनी देखील प्रेक्षकांसोबत संवाद साधला. तसेच सोनी मराठी वाहिनीच्या इंडियन आयडॉल ची कन्टेस्तंत कु सुरभी कुलकर्णी हिने सुमधुर आवाजात गाणी म्हणून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या शेवटी समिती सदस्य यांनी संपूर्ण फेस्टिवल मध्ये सहभागी झालेले मान्यवर, सहभागी स्पर्धक, वाई पोलीस स्टेशन , वाई नगरपरिषद , विश्वस्त काशीविश्वेश्वर मंदिर गणपती घाट , कृष्णाबाई संस्थान गणपती आळी , सोनावले मांडववाले , सर्व पत्रकार बांधव, यश फोटोज , प्रणव आर्ट्स , गणपती घाटावरील सर्व व्यावसायिक, हम तुम क्रिएशन, निखील चव्हाण, रॉयलवे व वाईकर रसिक प्रेक्षक यांचे आभार मानले. याप्रसंगी वाई फेस्टिवल चे अध्यक्ष शरद चव्हाण, कोषाध्यक्ष ॲड रमेश यादव, सचिव श्री सुनील शिंदे, निमंत्रक श्री अमर कोल्हापुरे, उत्कर्ष पतसंस्थेच्या अध्यक्षा श्रीमती अनुराधा कोल्हापुरे, फेस्टिवल चे समिती सदस्य श्री मदन साळवेकर , श्री श्रीकांत शिंदे , श्री सलीमभाई बागवान , श्री संजय वाईकर , श्री सागर मुळे , श्री वैभव फुले , श्री भूषण तारू , श्री शैलेंद्र गोखले , श्री अमीर बागुल , सौ प्रीती कोल्हापुरे , श्री नितीन वाघचौडे , श्री तुकाराम जेधे , श्रीमती नीला कुलकर्णी , श्रीमती अलका घाडगे, श्री प्रशांत मांढरे , श्री प्रणव गुजर , श्री निखिल चव्हाण , श्री नितीन शिंदे , श्री ओंकार सपकाळ हे उपस्थित होते.
