Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » वाई फेस्टिवल २०२४ अंतर्गत आयोजित राज्यस्तरीय ग्रुप डान्स स्पर्धा प्रेक्षकांच्या अलोट प्रतिसादाने यशस्वी

वाई फेस्टिवल २०२४ अंतर्गत आयोजित राज्यस्तरीय ग्रुप डान्स स्पर्धा प्रेक्षकांच्या अलोट प्रतिसादाने यशस्वी

वाई फेस्टिवल २०२४ अंतर्गत आयोजित राज्यस्तरीय ग्रुप डान्स स्पर्धा प्रेक्षकांच्या अलोट प्रतिसादाने यशस्वी

वाई -वाई फेस्टिवल २०२४ अंतर्गत आयोजित राज्यस्तरीय ग्रुप डान्स स्पर्धा प्रेक्षकांच्या अलोट प्रतिसादाने यशस्वीपणे पार पडली. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून आलेल्या २० हून अधिक स्पर्धक गटांनी नृत्यकलेचा भव्य आविष्कार सादर करत स्पर्धेचे रंगतदार स्वरूप वाढवले. स्पर्धेमध्ये प्रत्येक गटाने वेगवेगळ्या नृत्यशैलींचा अप्रतिम संगम सादर केला. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ.नितीन उत्तमराव सावंत यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून युवा पिढीने कलाक्षेत्रात अधिक सक्रिय होण्याचे आवाहन केले. व अगदी लहानातल्या लहान कलाकारांना देखील व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम वाई फेस्टिवल करत आहे याचे कौतुक देखील त्यांनी केले. स्पर्धेच्या परिक्षणासाठी नृत्यक्षेत्रातील तज्ज्ञ व सिने अभिनेत्री मा. अश्विनी महांगडे, कु सिद्धी ढापरे, कराड व श्री रोहित पाटील, कोल्हापूर यांना आमंत्रित केले होते. माझ्यासारख्या कलाकारांना घडविणारे हे व्यासपीठ या सोहळ्याचे नेतृत्व करण्याऱ्या श्री.अमर कोल्हापुरे यांच्या नावाप्रमाणे अमर राहो असे वक्तव्य सिने अभिनेत्री मा अश्विनी महांगडे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. नृत्यसादरीकरणाची कलात्मकता, अभिव्यक्ती आणि सादरीकरणातील सुसंगतीवर आधारित गुणांकन केले. या कार्यक्रमासाठी ब्लॉसम चिल्ड्रन अकॅडमी चे संस्थापक श्री शिवाजी शिंदे व युवा उद्योजक श्री मेहुल पुरोहित उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी फेस्टिवलचे अध्यक्ष श्री शरद चव्हाण सर यांचा त्यांच्या पंच्याहत्तरी निमित्त उत्कर्ष परिवारातर्फे मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यांच्या मानपत्राचे वाचन उत्कर्ष पतसंस्थेच्या अध्यक्षा श्रीमती अनुराधा कोल्हापुरे यांनी केले. या स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा डी टू डी क्वीन्स, कराड यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तसेच ओम साई डान्स ग्रुप रत्नागिरी, खेड यांनी द्वितीय व एंजल डान्स ग्रुप पुणे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. यामध्ये चतुर्थ क्रमांक श्री डान्स अकॅडमी, वाई व पाचवा क्रमांक अनुष्का कला ग्रुप, वाई यांना मिळाला. कार्यक्रमाचे अतिथी डॉ नितीन सावंत, वाई फेस्टिवल चे अध्यक्ष शरद चव्हाण, कोषाध्यक्ष ॲड रमेश यादव, सचिव श्री सुनील शिंदे, निमंत्रक श्री अमर कोल्हापुरे यांच्या हस्ते करण्यात आले. 

याचवेळी वाई फेस्टिवल २०२४ अंतर्गत घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचे बक्षिस वितरण देखील करण्यात आले. गट क्र १- इयत्ता १ ली व २ री मध्ये प्रथम क्रमांक कु इशा अभिजित शिंदे, द्वितीय क्रमांक कु देवांश रितेश घोणे, तृतीय क्रमांक कु संस्कार गणेश दाखटकर यांनी पटकाविला. गट क्र २ – इयत्ता ३ री व ४ थी मध्ये प्रथम क्रमांक रेवा विकास थोरवे, द्वितीय क्रमांक कु विघ्नेश महेश डोईफोडे, तृतीय क्रमांक कु तनया चित्तरंजन कोठावळे, गट क्र ३ – इयत्ता ५ वी ते ६ वी प्रथम क्रमांक सृष्टी महेश जेबले, द्वितीय क्रमांक कु ईश्वरी किरण कांबळे, तृतीय क्रमांक कु श्रीजित कमलेश धुमाळ, गट क्र ४ – इयत्ता ७ वी ते ८ वी प्रथम क्रमांक कु श्रेया प्रकाश पांचाळ, द्वितीय क्रमांक कु वेदांत महेश बडे, तृतीय क्रमांक कु प्रणित सदा चौरे, गट क्र ५ – इयत्ता ९ वी ते १० वी प्रथम क्रमांक कु साई अजय गुजर, द्वितीय क्रमांक कु वैष्णवी गिरीश गुजर, तृतीय क्रमांक कु श्रेया महेंद्र कदम, गट क्र ६ खुला गट प्रथम क्रमांक कु कृष्णा कुपाडे, द्वितीय क्रमांक कु सुजल शंकर मांढरे, तृतीय क्रमांक सौ प्रीती कुणाल बागुल, गट क्र ७ – दिव्यांग यामध्ये प्रथम क्रमांक कु नक्ष निलेश चौधरी, द्वितीय क्रमांक कु अथर्व अरविंद गोळे, तृतीय क्रमांक कु इंद्रनील सचिन सुळके यांनी यश संपादन केले, तसेच विविध गुणदर्शन स्पर्धेत सांघिक गटात प्रथम क्रमांक वाई कला मंच, वाई , द्वितीय क्रमांक सावी कथ्थक डान्स ग्रुप, वाई , तृतीय क्रमांक शिवमल्हार कलापथक बावधन, उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक श्वेता डान्स स्टुडीओ, वाई, वैयक्तिक लहान गटात प्रथम क्रमांक कु ज्ञानदा योगेश दाहोत्रे, द्वितीय क्रमांक कु शरया योगेश पोरे, कु समर्थ प्रसाद भिसे, वैयक्तिक मोठ्या गटात प्रथम क्रमांक कु अथर्व नंदकुमार खरे, द्वितीय क्रमांक कु सानिका संजय लोहारे, तृतीय क्रमांक सौ नीलम कुंडलिक सावंत यांनी यश संपादन केले. यांचा देखील सन्मान मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी वाई फेस्टिवल चे अध्यक्ष शरद चव्हाण, कोषाध्यक्ष ॲड रमेश यादव, सचिव श्री सुनील शिंदे, निमंत्रक श्री अमर कोल्हापुरे, याप्रसंगी उत्कर्ष पतसंस्थेच्या अध्यक्षा श्रीमती अनुराधा कोल्हापुरे, फेस्टिवल चे समिती सदस्य श्री मदन साळवेकर , श्री श्रीकांत शिंदे , श्री सलीमभाई बागवान , श्री संजय वाईकर , श्री सागर मुळे , श्री वैभव फुले , श्री भूषण तारू , श्री शैलेंद्र गोखले , श्री अमीर बागुल , सौ प्रीती कोल्हापुरे , श्री नितीन वाघचौडे , श्री तुकाराम जेधे , श्रीमती नीला कुलकर्णी , श्रीमती अलका घाडगे, श्री प्रशांत मांढरे , श्री प्रणव गुजर , श्री निखिल चव्हाण , श्री नितीन शिंदे , श्री ओंकार सपकाळ हे उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते २७ एप्रिल दरम्यान चालेल

Post Views: 74 नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते

Live Cricket