कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उद्योगजगत » मंजू इन्स्टिट्यूट चा 32 वा वर्धापन दिन 15 ऑगस्ट रोजी

मंजू इन्स्टिट्यूट चा 32 वा वर्धापन दिन 15 ऑगस्ट रोजी

मंजू इन्स्टिट्यूट चा 32 वा वर्धापन दिन 15 ऑगस्ट रोजी

सातारा -मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा या संस्थेचा 32 वा वर्धापन दिन 15 ऑगस्ट रोजी संपन्न होत आहे.गेल्या 31 वर्षात संस्थेने उत्तुंग भरारी घेतली आहे. या कालावधीमध्ये संस्थेने अनेक विद्यार्थी यशस्वीरित्या घडवले आहेत संस्थेचा मुख्य हेतू ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना अत्यंतअल्प फी मध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे करणे व भारताचा जबाबदार नागरिक बनवणे हे आहे. संस्थेचे खास वैशिष्ट्य म्हणजे तज्ञ प्राध्यापक, प्रशस्त किचन, अद्यावत लायब्ररी, स्मार्ट क्लासरूम, डेमो रेस्टॉरंट व बाय हाउसकीपिंग रूम, प्रशस्त कॉम्प्युटर लॅब, अद्यावत ड्रॉइंग रूम,भरपूर प्रॅक्टिस ,भरपूर साईट विजिट या गोष्टींचा समावेश आहे .

संस्थेने गेल्या 32 वर्षात भरपूर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग प्लेसमेंट सुविधा भारतात व परदेशात दिली आहे व ही सेवा अविरत चालू आहे.संस्थेत बीएससी हॉस्पिटॅलिटी स्टडीज डिग्री तीन वर्ष ,डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट, डिप्लोमा फॅशन डिझाईन, डिप्लोमा इंटिरियर डिझाईनिंग, डिप्लोमा आर्किटेक्चर, वास्तुशास्त्र आरेखन दोन वर्ष अभ्यासक्रम तसेच हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग टेक्नॉलॉजी एक वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर एक वर्ष इत्यादी अभ्यासक्रमास महाराष्ट्र शासनाची मान्यता आहे. वरील अभ्यासक्रमास शैक्षणिक पात्रता ही दहावी पास ते पदवीधर पर्यंत आहे. डिग्री अभ्यासक्रम महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती व हॉस्टेल व मेसची शिष्यवृत्ती उपलब्ध आहे. या गोष्टीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. वर्धापन दिनानिमित्त कॉलेजमध्ये रक्तदान शिबिर, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, पाककला स्पर्धा ,निबंध स्पर्धा, तिरंगा रॅली , हर घर तिरंगा, सत्यनारायण पूजा व अल्पोपहाराचे नियोजन करण्यात आले आहे.

तरी संस्थेच्या 32 व्या वर्धापनानिमित्त सर्व आजी-माजी विद्यार्थी व पालक यांनी संस्थेमध्ये हजर राहून वर्धापन दिनाचा आनंद द्विगुणीत करावा. असे संस्थेचे प्राचार्य अनिल महादेव चव्हाण व व्यवस्थापिका सौ .अमृता चव्हाण, मॅनेजमेंट हेड कुमारी सिमरन अनिल चव्हाण यांनी आव्हान केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket