कोल्हापुरातील नांदणी गावातील माधुरी हत्ती गेल्याने शिवसेना सातारा जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले यांनी जिओ कार्ड पोर्ट करून बहिष्कार केला व्यक्त
सातारा (अली मुजावर )-कोल्हापूरच्या नांदणी गावच्या मठातील प्रसिद्ध हत्तिणी गुजरातमधील वनताराला रवाना झाल्याने कोल्हापूरकर भावूक झाले होते. हत्तिणीसोबत असलेलं भावनिक नातं आता संपल्याने ७४३ गावांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी जिओ वर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेताला.हत्तीण जाताच नांदणी गाव आणि या मठाशी भावनिक नातं असलेल्या तब्बल ७४३ गावांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे. ही घटना धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक पातळीवर मोठा धक्का ठरल्याने ग्रामस्थांनी ‘Jio Ban’ म्हणजेच रिलायन्स जिओ नेटवर्कवर बहिष्कार घालण्याचा आणि सिम कार्ड दुसऱ्या कंपन्यांकडे पोर्ट करण्याचा निर्धार केला आहे.
त्यालाच प्रतिसाद म्हणून सातारा जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख युवा नेतृत्व रणजितसिंह भोसले यांनी जिओ कार्ड आणि उत्पादनावर बहिष्कार टाकला आहे. सातारा जिल्ह्यात ही माधुरी हत्तीनीसाठी परत आणण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मागणी होत आहे.




