मतदार यादीतून नाव वगळले असल्यास ३० सप्टेंबरपर्यंत पुन्हा नाव नोंदणीची संधी, ३१ ऑगस्टला प्रारूप मतदार याद्या अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर
Home » ठळक बातम्या » टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर दमदार विजय, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये दिमाखात प्रवेश

टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर दमदार विजय, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये दिमाखात प्रवेश

टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर दमदार विजय, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये दिमाखात प्रवेश

भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या  फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात दुबईत झालेल्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियानं 4 विकेट्सनं विजय मिळवला. भारतीय टीमनं यापूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफीचं 2002 साली श्रीलंकेसह संयुक्त विजेतेपद मिळवले होते. त्यानंतर 2013 साली इंग्लंडचा पराभव करत विजेतेपद पटावलं. आता 12 वर्षांनी या स्पर्धेचं तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवण्यापासून टीम इंडिया फक्त एक विजय दूर आहे. न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दुसऱ्या सेमी फायनलमधील विजेत्याशी भारताची लढत होईल. फायनल मॅच रविवारी (9 मार्च) दुबईत होणार आहे. 

ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदा बॅटिंग करत टीम इंडियासमोर 265 रन्सचं आव्हान दिलं होतं. भारताकडून विराट कोहलीनं सर्वात जास्त 84 रन्स केले. त्याला श्रेयस अय्यरनं 45 रन्स करत उत्तम साथ दिली. विराट कोहली आऊट झाल्यानंतर बॅटिंगला आलेल्या हार्दिक पांड्यानं फटेबाजी करत 24 बॉलमध्ये 28 रन्स केले.टीम इंडियाचा विजय जवळ आणला. अखेर केएल राहुलनं सिक्सर लगावत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 

 

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

मतदार यादीतून नाव वगळले असल्यास ३० सप्टेंबरपर्यंत पुन्हा नाव नोंदणीची संधी, ३१ ऑगस्टला प्रारूप मतदार याद्या

मतदार यादीतून नाव वगळले असल्यास ३० सप्टेंबरपर्यंत पुन्हा नाव नोंदणीची संधी, ३१ ऑगस्टला प्रारूप मतदार याद्या मुंबई : भारत निवडणूक

Live Cricket