दुष्काळग्रस्त ८७ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना ४,३७२ कोटींची दिवाळी अग्रीम मदत-मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील दुष्काळी परिस्थितीत गायरान व वैयक्तिक जमिनीवर अतिरिक्त चारा पिकांच्या लागवडीला मान्यता-रोहयो मंत्री भरत गोगावले माजी सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तालुकानिहाय दौरे डिजिटल जीवन प्रमाणपत्र अभियान पेन्शनधारकांना घरपोच मिळणार सेवा दुष्काळाच्या संकटाचे संधीत रूपांतर करा; कायमस्वरूपी टंचाईमुक्तीसाठी नियोजनबद्ध कामे करा – जिल्हाधिकारी संतोष पाटील  सातारा येथील यशोदा शिक्षण संस्था संचलित साधना प्राथमिक शाळेचा विद्यार्थी रणवीर सावंतचा राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत प्रथम क्रमांक
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » शेतावरचा रस्ता वहीवाटीचा वाहनानुसार रस्ता द्यावाच लागणार!

शेतावरचा रस्ता  वहीवाटीचा वाहनानुसार रस्ता द्यावाच लागणार!

शेतावरचा रस्ता  वहीवाटीचा वाहनानुसार रस्ता द्यावाच लागणार!

ज्या शेतकऱ्यांच्या शेतावरील वहीवाटीचा रस्ता काही कारणास्तव अडवला गेलेला आहे, त्यांना दिलासा देणारी बातमी आहे, तर ज्यांनी शेतीवरच्या वाटा रोखून धरल्या आहेत, अशांना मोठा दणका मिळणार आहे. कारण वहीवाटीत वाहन वापरानुसार रस्ता द्यावा लागणार आहे. रस्ता तयार करण्यासंबंधीचा निर्णय तहसीलदारांना घेता यावा यासाठी ‘गाइडलाइन्स’ प्रसिद्ध करण्याच्या सूचना सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्या आहेत.

यांत्रिकीकरणामुळे सध्या शेत वहीवाटीमध्ये मोठ्या वाहनांचा वापर होत असल्याने वाहन प्रकारानुसार शेत जमीन वहिवाट रस्ता बनवण्याबाबत तहसीलदारांना निर्णय घेता यावा यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात याव्यात, अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.

चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री शासनाने शेत रस्त्यांचे वर्गीकरण केले आहे. त्यानुसार जे रस्ते अस्तित्वात आहेत त्यांना क्रमांक देण्यात यावेत.

शेतजमिनीच्या खरेदी विक्रीच्या दस्त नोंदणीमध्ये शेत रस्त्याचा समावेश बंधनकारक करणे व शेत रस्त्यांच्या नोंदणी ७/१२ इतर हक्कात करण्याबाबत महसूल मंत्री यांच्या दालनात बैठक झाली. वित्त नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय आणि कामगार राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार अभिमन्यू पवार, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार, सहसचिव अजित देशमुख यावेळी उपस्थित होते.

महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, शासनाने शेत रस्त्यांचे वर्गीकरण केले आहे. त्यानुसार जे रस्ते अस्तित्वात आहेत त्यांना क्रमांक देण्यात यावेत. शेतजमीमध्ये वहिवाट करण्यासाठी अस्तित्वात असलेले रस्ते काही ठिकाणी अरुंद आहेत. अशा ठिकाणी मोठी वाहने जाण्यास अडचण निर्माण होऊन तक्रारही होतात. शेत वहिवाट रस्त्याची तक्रार सुनावणी तहसीलदार यांच्याकडे होते. त्यानंतर त्यावर थेट अपील उच्च न्यायालयात केले जाते. थेट अपील होण्यापूर्वी अतिरिक्त जिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील करता यावे यासाठी एक स्टेपमध्ये असणे आवश्यक असून त्यानुसार नियमात सुधारणा करण्यात याव्यात अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

दुष्काळग्रस्त ८७ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना ४,३७२ कोटींची दिवाळी अग्रीम मदत-मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील

दुष्काळग्रस्त ८७ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना ४,३७२ कोटींची दिवाळी अग्रीम मदत-मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील सातारा जिल्ह्यातील ३

Live Cricket