सातारा शहराच्या विकासकामांसाठी नगरसेविका शिवानीताई कळसकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट एअर शो निमित्त सातारा शहरात वाहतुकीत बदल नगरपरिषद व हिलदारीचा पुढाकार; आय लव्ह पाचगणी फेस्टिव्हल’मध्ये उत्कृष्ट तीन स्टॉलधारकांना ‘स्वच्छ स्टॉल पुरस्कार’ देऊन गौरविणार एल निनोच्या आव्हानावर मात करण्यासाठी सातारा जिल्ह्यात नाविन्यपूर्ण ‘खोडवा ऊस विकास कार्यक्रम किल्ले प्रतापगडावर २६ नोव्हेंबरला भव्य स्वच्छता व संवर्धन महाअभियान; ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ उपक्रमांतर्गत राज्यव्यापी जागर स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या विकासाच्या विचारांवर शासनाची वाटचाल – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » एअर शो निमित्त सातारा शहरात वाहतुकीत बदल

एअर शो निमित्त सातारा शहरात वाहतुकीत बदल

एअर शो निमित्त सातारा शहरात वाहतुकीत बदल

सातारा  – सातारा सैनिक स्कूल शाळेच्या वतीने व भारतीय वायु सेनेच्या सहकार्याने भारतीय वायु सेनेची सुर्यकिरण एरोबॅटिक टिम साताऱ्यात दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी हवाई कसरती सादर करणार आहेत. या कार्यक्रमास सैनिक स्कूल सातारा या ठिकाणी व्हीव्हीआयपी, व्हीआयपी तसेच संपूर्ण सातारा शहर व जिल्हयातून मोठ्या प्रमाणात शालेय विदयार्थी विदयार्थीनी, नागरीक यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणेची शक्यता आहे. याकरिता सदर कार्यक्रमावेळी वाहतुकीस कोणताही अडथळा होवु नये म्हणुन वाहतुक व्यवस्थेत बदल करण्यात येत आहे.

अ) वाहतुकीकरीता बंदी घालणेत आलेला मार्ग –

दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजीचे सकाळी ०८.०० वा. पासुन ते दुपारी ०२.०० वा.पर्यंत खालील नमुद मार्गावर सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंदी घालणेत येत आहे.

१) पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक व बॉम्बे रेस्टॉरट चौक ते पोवई नाका हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांना बंद करणेत येत आहे.

२) गोडोली नाका, साईबाबा मंदिर मार्गे जिल्हा परिषद चौक येथे येणेस व जाणेस सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करणेत येत आहे.

३) कनिष्क मंगल कार्यालय बाजुकडुन जिल्हा परिषद चौक येथे येणेस व जाणेस सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करणेत येत आहे.

ब) वाहतुकीकरीता पर्यायी मार्ग-

१) बॉम्बे रेस्टॉरंट बाजुकडुन सातारा शहरात प्रवेश करणारी सर्व प्रकारची वाहने ही अजंठा चौक, गोडोली नाका मार्गे पोवई नाका बाजुकडे येतील व त्याच मार्गाने बाहेर जातील.

२) वाढे फाटा बाजुकडुन सातारा शहरात प्रवेश करणारी सर्व प्रकारची वाहने ही जुना आर.टी.ओ चौक-पारंगे चौक पोवई नाका मार्गे येतील व त्याच मार्गाने बाहेर जातील.

३) खेड चौक बाजुकडुन सातारा शहरात प्रवेश करणारी सर्व प्रकारची वाहने ही सिव्हील हॉस्पीटल पोवई नाका मार्गे आत येतील व त्याच मार्गाने बाहेर जातील.

४) मोळाचा ओढा बाजुकडुन सातारा शहरात प्रवेश करणारी सर्व प्रकारची वाहने ही भुविकास चौक – एसटी स्टेंड – पोवई नाका मार्गे येतील व त्याच मार्गाने बाहेर जातील.

क) वरील सर्व मार्गावर रूग्णवाहिका पोलीस वाहने, अग्निशामक दलाची वाहने, इतर सरकारी वाहने वगळून इतर सर्व प्रकारच्या वाहनात वरील प्रमाणे बदल करण्यात येत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा शहराच्या विकासकामांसाठी नगरसेविका शिवानीताई कळसकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

सातारा शहराच्या विकासकामांसाठी नगरसेविका शिवानीताई कळसकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट सातारा : सातारा शहरातील विविध विकासकामे, नागरी

Live Cricket