नगरपरिषद व हिलदारीचा पुढाकार; आय लव्ह पाचगणी फेस्टिव्हल’मध्ये उत्कृष्ट तीन स्टॉलधारकांना ‘स्वच्छ स्टॉल पुरस्कार’ देऊन गौरविणार एल निनोच्या आव्हानावर मात करण्यासाठी सातारा जिल्ह्यात नाविन्यपूर्ण ‘खोडवा ऊस विकास कार्यक्रम किल्ले प्रतापगडावर २६ नोव्हेंबरला भव्य स्वच्छता व संवर्धन महाअभियान; ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ उपक्रमांतर्गत राज्यव्यापी जागर स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या विकासाच्या विचारांवर शासनाची वाटचाल – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादर; पेपरफुटीविरोधी कायदा अधिक कठोर करण्याची शिफारस ड्रॅगन पॅलेस टेम्पल’मुळे नागपूरची जागतिक स्तरावर ओळख – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » किल्ले प्रतापगडावर २६ नोव्हेंबरला भव्य स्वच्छता व संवर्धन महाअभियान; ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ उपक्रमांतर्गत राज्यव्यापी जागर

किल्ले प्रतापगडावर २६ नोव्हेंबरला भव्य स्वच्छता व संवर्धन महाअभियान; ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ उपक्रमांतर्गत राज्यव्यापी जागर

किल्ले प्रतापगडावर २६ नोव्हेंबरला भव्य स्वच्छता व संवर्धन महाअभियान; ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ उपक्रमांतर्गत राज्यव्यापी जागर

​सातारा-भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला अर्पण केलेल्या संविधानाचा गौरव करण्यासाठी २६ नोव्हेंबर २०२६ रोजी संविधान दिनाचे औचित्य साधून राज्यभरात ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या नामांकनात समाविष्ट असलेल्या राज्यातील ११ गडकिल्ल्यांवर एकाच वेळी हा सोहळा पार पडणार असून, सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ले प्रतापगडावर जिल्हा प्रशासनाच्या वतीने या महाअभियानाचे सूक्ष्म व शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले आहे.  

​राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, पर्यटन, सामाजिक न्याय, महसूल व वन, सांस्कृतिक कार्य आणि उच्च व शालेय शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित केला आहे. किल्ले प्रतापगडावर जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्ह्यातील मान्यवर खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडेल.  

​प्रतापगडावर दि. २६ नोव्हेंबर रोजी  सकाळी ७:३० ते ९ वा.’माझा गड, माझी जबाबदारी’ आणि ‘मानाचा मुजरा, हटवूया कचरा’ या संकल्पनेनुसार गडाचा पायथा, वाहनतळ, पायऱ्यांचा मार्ग व परिसरात स्वच्छता मोहीमेद्वारे श्रमदान केले जाईल. यात दुर्गप्रेमी संस्था, ट्रेकिंग क्लब्स, युवक मंडळे, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी, एनसीसी, एनएसएस स्वयंसेवक व ग्रामस्थ सहभागी होतील.  

​शून्य कचरा प्रणाली: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) जनजागृती निधीतून ज्यूट व कापडी पिशव्यांचे वाटप करून संकलित कचऱ्याचे शास्त्रोक्त वर्गीकरण व पुनर्वापरासाठी विल्हेवाट लावली जाईल. यातून गडासाठी ‘शून्य कचरा गुणांकन’ निश्चित केले जाणार आहे. सकाळी ११ ते १२:१० वा. ​ उपस्थित मान्यवर व नागरिकांच्या उपस्थितीत संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन होईल. यावेळी राज्यातील इतर १० किल्ल्यांशी ऑनलाइन थेट संपर्क साधला जाईल. तसेच अनुच्छेद ५१अ (ग) अन्वये ऐतिहासिक वास्तू, वने व वन्यजीवांच्या रक्षणासाठी पर्यावरण संवर्धन व ‘माझी वसुंधरा’ शपथ दिली जाईल.  

​ ‘स्वराज्याचा वारसा, संविधानाचा वसा’ या मंचावर प्रबोधनात्मक पोवाडा, स्थानिक लोककला, पथनाट्ये व व्याख्याने होतील. तसेच गडसंवर्धनासाठी कार्य करणाऱ्या स्थानिक गडमित्रांचा व संस्थांचा गौरव करण्यात येईल.  

​ गडाच्या पायथ्याशी प्लास्टिकमुक्तीबाबत जनजागृती, पर्यटकांसाठी माहिती फलक, क्युआर कोड आधारित ऑडिओ गाईड आणि सहभागी स्वयंसेवकांसाठी डिजिटल प्रमाणपत्र प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे.  

​राज्यातील ११ किल्ल्यांवर एकाच वेळी उपक्रम:

प्रतापगडासह रायगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, राजगड, पन्हाळा, साल्हेर, लोहगड, सुवर्णदुर्ग, शिवनेरी आणि खंदेरी या युनेस्को नामांकित ११ किल्ल्यांवर एकाच वेळी हा उपक्रम राबवला जात आहे. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यात महसूल, वन, पोलीस व शिक्षण विभागाच्या समन्वयासाठी उपजिल्हाधिकारी स्तरावरील नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून वाहतूक व्यवस्थापनाचे नियोजन पूर्ण झाले आहे.  

​छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या प्रतापगडावर लोकशाही मूल्ये आणि पर्यावरण रक्षणाचा संकल्प करण्यासाठी २६ नोव्हेंबर रोजी सकाळी आयोजित या मोहिमेत जिल्ह्यातील नागरिक, इतिहासप्रेमी, तरुण, विद्यार्थी व दुर्गप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नगरपरिषद व हिलदारीचा पुढाकार; आय लव्ह पाचगणी फेस्टिव्हल’मध्ये उत्कृष्ट तीन स्टॉलधारकांना ‘स्वच्छ स्टॉल पुरस्कार’ देऊन गौरविणार

नगरपरिषद व हिलदारीचा पुढाकार; आय लव्ह पाचगणी फेस्टिव्हल’मध्ये उत्कृष्ट तीन स्टॉलधारकांना ‘स्वच्छ स्टॉल पुरस्कार’ देऊन गौरविणार पाचगणी- पाचगणी येथे दि.

Live Cricket