सातारा शहराच्या विकासकामांसाठी नगरसेविका शिवानीताई कळसकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
सातारा : सातारा शहरातील विविध विकासकामे, नागरी सुविधा आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगरसेविका शिवानीताई प्रीतम कळसकर यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान सातारा शहरातील नगरपालिका अंतर्गत येणाऱ्या विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करून नागरिकांच्या दैनंदिन समस्या आणि प्रलंबित विषय मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. शहरातील विकासकामांना गती मिळावी आणि नागरिकांना आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी त्यांनी पाठपुरावा केला.
सातारा शहराचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे नगरसेविका शिवानीताई प्रीतम कळसकर यांनी सांगितले.



