सातारा शहराच्या विकासकामांसाठी नगरसेविका शिवानीताई कळसकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट एअर शो निमित्त सातारा शहरात वाहतुकीत बदल नगरपरिषद व हिलदारीचा पुढाकार; आय लव्ह पाचगणी फेस्टिव्हल’मध्ये उत्कृष्ट तीन स्टॉलधारकांना ‘स्वच्छ स्टॉल पुरस्कार’ देऊन गौरविणार एल निनोच्या आव्हानावर मात करण्यासाठी सातारा जिल्ह्यात नाविन्यपूर्ण ‘खोडवा ऊस विकास कार्यक्रम किल्ले प्रतापगडावर २६ नोव्हेंबरला भव्य स्वच्छता व संवर्धन महाअभियान; ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ उपक्रमांतर्गत राज्यव्यापी जागर स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या विकासाच्या विचारांवर शासनाची वाटचाल – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » नगरपरिषद व हिलदारीचा पुढाकार; आय लव्ह पाचगणी फेस्टिव्हल’मध्ये उत्कृष्ट तीन स्टॉलधारकांना ‘स्वच्छ स्टॉल पुरस्कार’ देऊन गौरविणार

नगरपरिषद व हिलदारीचा पुढाकार; आय लव्ह पाचगणी फेस्टिव्हल’मध्ये उत्कृष्ट तीन स्टॉलधारकांना ‘स्वच्छ स्टॉल पुरस्कार’ देऊन गौरविणार

नगरपरिषद व हिलदारीचा पुढाकार; आय लव्ह पाचगणी फेस्टिव्हल’मध्ये उत्कृष्ट तीन स्टॉलधारकांना ‘स्वच्छ स्टॉल पुरस्कार’ देऊन गौरविणार

पाचगणी- पाचगणी येथे दि. २७ ते २९ नोव्हेंबरदरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या ‘आय लव्ह पाचगणी फेस्टिव्हल’मध्ये यंदा कला, संस्कृती आणि पर्यटनाच्या उत्सवाबरोबरच स्वच्छतेचाही जागर करण्यात येणार आहे. पाचगणी गिरीस्थान नगरपरिषद आणि हिलदारी यांच्या संयुक्त विद्यमाने, फेस्टिव्हल आयोजकांच्या सहकार्याने ‘स्वच्छ स्टॉल पुरस्कार’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा अभिनव प्रयत्न करण्यात येत आहे.

फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणाऱ्या स्टॉलधारकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करणे, ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित करणे, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे तसेच स्वच्छ आणि शाश्वत पर्यटन संस्कृतीला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. उत्सवाचा आनंद घेताना पर्यावरणाचे रक्षण आणि स्वच्छतेची जबाबदारीही प्रत्येकाने स्वीकारावी, हा या उपक्रमामागील महत्त्वपूर्ण संदेश आहे.

या पुरस्कारासाठी स्टॉलचे मूल्यमापन चार प्रमुख निकषांच्या आधारे करण्यात येणार आहे. यामध्ये स्टॉल व परिसराची नियमित स्वच्छता, ओला व सुका कचऱ्याचे योग्य वर्गीकरण आणि व्यवस्थापन, स्टॉलची आकर्षक सजावट व नीटनेटकेपणा तसेच ग्राहकांमध्ये कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती करणे या बाबींचा समावेश आहे. ग्राहकांनी कचरा निर्धारित कचरापेटीतच टाकावा, यासाठी स्टॉलधारकांनी प्रोत्साहन देणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

या चारही निकषांनुसार उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तीन स्टॉलधारकांची निवड करून त्यांना ट्रॉफी आणि गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामुळे फेस्टिव्हलमधील स्टॉलधारकांमध्ये स्वच्छतेबाबत सकारात्मक स्पर्धा निर्माण होण्याबरोबरच पर्यावरणपूरक व्यवसाय पद्धतींनाही चालना मिळणार आहे.

पाचगणी हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ असून, येथील निसर्गसौंदर्य आणि स्वच्छता टिकवून ठेवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. नगरपरिषदेच्या प्रयत्नांना नागरिक, व्यापारी, स्टॉलधारक आणि पर्यटकांची साथ मिळाल्यासच स्वच्छ, सुंदर आणि हरित पाचगणीचे स्वप्न साकार होऊ शकते. ‘आपला कचरा, आपली जबाबदारी’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीत उतरवून स्वच्छतेची संस्कृती रुजविण्याचा या उपक्रमातून प्रयत्न केला जाणार आहे.

या उपक्रमासाठी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील, नगराध्यक्ष दिलीपभाऊ बागडे, उपनगराध्यक्षा माधुरी कासुर्डे, आरोग्य सभापती राजश्री सणस तसेच सर्व नगरसेवक यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे.कला, संस्कृती आणि पर्यटनाचा आनंद लुटतानाच स्वच्छतेचा संकल्प जपूया आणि स्वच्छ, सुंदर व हरित पाचगणीच्या निर्मितीत सहभागी होऊया, असे आवाहन या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा शहराच्या विकासकामांसाठी नगरसेविका शिवानीताई कळसकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

सातारा शहराच्या विकासकामांसाठी नगरसेविका शिवानीताई कळसकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट सातारा : सातारा शहरातील विविध विकासकामे, नागरी

Live Cricket