सातारा शहराच्या विकासकामांसाठी नगरसेविका शिवानीताई कळसकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट एअर शो निमित्त सातारा शहरात वाहतुकीत बदल नगरपरिषद व हिलदारीचा पुढाकार; आय लव्ह पाचगणी फेस्टिव्हल’मध्ये उत्कृष्ट तीन स्टॉलधारकांना ‘स्वच्छ स्टॉल पुरस्कार’ देऊन गौरविणार एल निनोच्या आव्हानावर मात करण्यासाठी सातारा जिल्ह्यात नाविन्यपूर्ण ‘खोडवा ऊस विकास कार्यक्रम किल्ले प्रतापगडावर २६ नोव्हेंबरला भव्य स्वच्छता व संवर्धन महाअभियान; ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ उपक्रमांतर्गत राज्यव्यापी जागर स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या विकासाच्या विचारांवर शासनाची वाटचाल – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » एल निनोच्या आव्हानावर मात करण्यासाठी सातारा जिल्ह्यात नाविन्यपूर्ण ‘खोडवा ऊस विकास कार्यक्रम

एल निनोच्या आव्हानावर मात करण्यासाठी सातारा जिल्ह्यात नाविन्यपूर्ण ‘खोडवा ऊस विकास कार्यक्रम

एल निनोच्या आव्हानावर मात करण्यासाठी सातारा जिल्ह्यात नाविन्यपूर्ण ‘खोडवा ऊस विकास कार्यक्रम

सातारा – बदलत्या हवामानाच्या व दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न टिकवून ठेवण्यासाठी आणि जमिनीचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत कृषी विभाग (आत्मा), सातारा यांच्या मार्फत खोडवा ऊस विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील नोंदणीकृत शेतकरी गटांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प संचालक (आत्मा) अजय शेंडे यांनी केले आहे.

पालकमंत्री श्री. शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून ११७०० एकर क्षेत्रावर शंभर टक्के अनुदानावर साकार झालेल्या या पथदर्शी प्रकल्पास जिल्हा नियोजन समितीची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. सातारा जिल्ह्यात सर्वसाधारणपणे १,१४,००० हेक्टर क्षेत्रावर ऊस पीक घेतले जाते. मात्र, सध्याच्या एल निनोच्या प्रभावामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, आगामी काळात उसाच्या क्षेत्रातही घट होण्याची शक्यता आहे. सततच्या एकपीक पद्धतीमुळे व रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण १ टक्क्यावरून ०.३० टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. हुमणी किडीचा प्रादुर्भाव आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे उत्पादकता घटली असतानाच, उसाच्या शाश्वत उत्पादन वाढीसाठी इतर कोणतीही नियमित योजना अस्तित्वात नसल्याने हा नाविन्यपूर्ण प्रकल्प तयार करण्यात आला आहे.

पाचट व पाणी व्यवस्थापनाचे अनन्यसाधारण महत्त्व दुष्काळी परिस्थितीत उसाचे उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी ऊस पाचट व्यवस्थापन, जमिनीत ओलावा टिकवून ठेवणे आणि शास्त्रोक्त पाण्याचा निचरा करणे अत्यंत गरजेचे बनले आहे. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा शहराच्या विकासकामांसाठी नगरसेविका शिवानीताई कळसकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

सातारा शहराच्या विकासकामांसाठी नगरसेविका शिवानीताई कळसकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट सातारा : सातारा शहरातील विविध विकासकामे, नागरी

Live Cricket