सातारा येथील यशोदा शिक्षण संस्था संचलित साधना प्राथमिक शाळेचा विद्यार्थी रणवीर सावंतचा राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत प्रथम क्रमांक राज्यातील शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून सोडवणेसाठी शासनाने जाहिर केलेल्या पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यामध्ये रक्कम जमा झालेली चौथी यादी जाहीर किसन वीर परिवारामध्ये सुख, समद्धा घेऊन ही ढिवाळी येवो-प्रमोद शिदे ; कामगारांना दीपावलीनिमित्त साखर वाटपास सुरूवात यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये जागतिक बचत दिनानिमित्त आर्थिक साक्षरतेचा जागर साहित्य निर्मितीतून घडणारे संस्कार विद्यार्थ्यांच्या उत्कर्षाला पूरक ठरतात- श्रीरंग काटेकर सातारा जिल्ह्यातील सातारा शहर परिसरातील शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या टोळीला सातारा पोलिसांनी संपूर्ण सातारा जिल्हा हद्दीतून ०४ महिने कालावधीकरिता केले हद्दपार
Home » Uncategorized » पाचवड येथे वित्तीय समावेशन अभियानांतर्गत भव्य शिबिराचे आयोजन बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक श्री. प्रभात किरण यांची प्रमुख उपस्थिती; विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे नागरिकांना आवाहन

पाचवड येथे वित्तीय समावेशन अभियानांतर्गत भव्य शिबिराचे आयोजन बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक श्री. प्रभात किरण यांची प्रमुख उपस्थिती; विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे नागरिकांना आवाहन

पाचवड येथे वित्तीय समावेशन अभियानांतर्गत भव्य शिबिराचे आयोजन बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक श्री. प्रभात किरण यांची प्रमुख उपस्थिती; विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे नागरिकांना आवाहन

पाचवड:भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाच्या (DFS) निर्देशानुसार देशभरात राबविण्यात येत असलेल्या ग्रामपंचायत व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था स्तरावरील वित्तीय समावेशन योजनांच्या संतृप्तीकरण अभियानांतर्गत सातारा जिल्ह्यातील पाचवड येथे दिनांक 03 नोव्हेंबर 2026 रोजी भव्य वित्तीय समावेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमास बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक (Executive Director) श्री. प्रभात किरण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी श्री. नागेश पाटील, गट विकास अधिकारी श्री. नारायण घोलप, बँक ऑफ महाराष्ट्रचे उपमहाप्रबंधक श्री. दीपक पाटील, अंचल प्रबंधक श्री. राहुल जोशी व उपअंचल प्रबंधक श्री. अमर मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर स्वागतगीताद्वारे उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी विविध बँकांनी उभारलेल्या माहिती व सेवा स्टॉलना भेट देऊन बँकांच्या विविध योजना व सेवांची माहिती घेतली.

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार दिनांक 21 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या या अभियानाचा मुख्य उद्देश प्रत्येक पात्र नागरिकाला बँकिंग सेवा आणि सामाजिक सुरक्षा योजनांच्या कक्षेत आणणे हा आहे. या अभियानांतर्गत प्रधानमंत्री जनधन योजना (PMJDY), प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY), प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY), अटल पेन्शन योजना (APY), किसान क्रेडिट कार्ड (KCC), नवीन बचत खाती उघडणे, प्रलंबित खात्यांचे पुनर्प्रमाणीकरण (Re-KYC), आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication), केंद्रीय केवायसी (CKYC) तसेच पात्र लाभार्थ्यांना विविध वित्तीय सेवांशी जोडणे अशा एकूण 12 महत्त्वपूर्ण बाबींवर विशेष भर देण्यात येत आहे.

या शिबिरामध्ये पाचवड, जांब तसेच परिसरातील गावांतील ग्रामस्थ, बचत गटांतील महिला, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM/उमेद) चे अधिकारी व कर्मचारी, बँक मित्र (BCs), विविध बँकांचे अधिकारी व कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. विविध बँकांच्या स्टॉलच्या माध्यमातून नागरिकांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. पात्र लाभार्थ्यांना योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच बँक खाते उघडणे, विमा संरक्षण, पेन्शन योजना व किसान क्रेडिट कार्ड यांसारख्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. नागेश पाटील यांनी नागरिकांना केंद्र शासनाच्या विविध वित्तीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच प्रत्येक नागरिकाने आपला क्रेडिट स्कोअर (Credit Score) चांगला राखण्याची आवश्यकता अधोरेखित केली. वेळेवर कर्जाची परतफेड केल्यास भविष्यात कर्ज घेताना अनुकूल व्याजदर व इतर आर्थिक सुविधा मिळण्यास मदत होते, असे त्यांनी नमूद केले.

बँक ऑफ महाराष्ट्रचे उपमहाप्रबंधक श्री. दीपक पाटील यांनी वित्तीय समावेशन अभियानांतर्गत समाविष्ट असलेल्या 12 महत्त्वपूर्ण बाबींची सविस्तर माहिती देऊन नागरिकांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन केले.

या अभियानामुळे ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत बँकिंग सेवा पोहोचण्यास मदत होणार असून आर्थिक साक्षरता, सामाजिक सुरक्षा आणि सर्वसमावेशक आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. प्रत्येक पात्र नागरिक व कुटुंबाने या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून केंद्र शासनाच्या विविध वित्तीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी उपस्थित मान्यवरांनी केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा येथील यशोदा शिक्षण संस्था संचलित साधना प्राथमिक शाळेचा विद्यार्थी रणवीर सावंतचा राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत प्रथम क्रमांक

सातारा येथील यशोदा शिक्षण संस्था संचलित साधना प्राथमिक शाळेचा विद्यार्थी रणवीर सावंतचा राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत प्रथम क्रमांक सातारा-येथील यशोदा शिक्षण

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून सोडवणेसाठी शासनाने जाहिर केलेल्या पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यामध्ये रक्कम जमा झालेली चौथी यादी जाहीर

Live Cricket