सातारा जिल्ह्यातील सातारा शहर परिसरातील शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या टोळीला सातारा पोलिसांनी संपूर्ण सातारा जिल्हा हद्दीतून ०४ महिने कालावधीकरिता केले हद्दपार
सातारा -सातारा जिल्ह्यामधील सातारा शहर परिसरात सातत्याने शरीराविरुद्धचे व मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणारे टोळीचा प्रमुख टोळीचा प्रमुख १) जिवन महादेव गायकवाड वय २९ वर्षे, रा. प्रतापसिंहनगर, ता. जि. सातारा तसेच टोळी सदस्य २) अनिकेत बापू गायकवाड वय २९ वर्षे, रा. प्रतापसिंहनगर, ता. जि. सातारा ३) सुनील सुभाष गायकवाड वय ३२ वर्षे, सर्व रा. प्रतापसिंहनगर, खेड, सातारा, ता. जि. सातारा यांचे टोळीवर सातारा जिल्ह्यामधील विविध पोलीस स्टेशनमध्ये शरीराविरुद्धचे व मालमत्तेविरुद्धचे गंभीर स्वरूपाचे दखलपात्र गुन्हे दाखल असल्याने नमूद टोळीच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा बसावा याकरिता सातारा शहर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री. सचिन म्हेत्रे, पोलीस निरीक्षक सातारा शहर पोलीस ठाणे यांनी सदर टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे संपूर्ण सातारा जिल्हा हद्दीतून हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी विपुल विजय पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग यांनी केली होती.
टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांचे टोळीवर सातारा जिल्ह्यामध्ये शरीराविरुद्धचे व मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल असल्यामुळे त्यांच्यावर वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई करूनसुद्धा त्यांनी आपल्या टोळीने गुन्हेगारी कारवाया चालूच ठेवल्याने, त्यांच्या टोळीवर कायद्याचा कोणताच धाक न राहिल्यामुळे सातारा जिल्ह्यातील लोकांना मोठ्या प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता. अशा टोळीवर कायद्याचा वचक राहावा याकरिता सर्वसामान्य जनतेतून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत होती.
मा. निखील पिंगळे, हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचे समोर टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांच्या टोळीची सुनावणी होऊन सदर टोळीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे संपूर्ण सातारा जिल्हा हद्दीतून ०४ महिने कालावधीकरिता हद्दपारीचा आदेश पारित केला आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरिता आगामी काळात सातारा जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करण्यात येणार आहेत.
या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री विश्वजीत घोडके, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, पो.हवा. प्रमोद सावंत, अमित सपकाळ, राजू कांबळे, शिवाजी भिसे, म.पो.कॉ. अनुराधा सणस, सातारा शहर पोलीस ठाणेकडील पोहवा दीपक इंगवले, संदीप पवार यांनी योग्य पुरावा सादर केला.



