रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महाबळेश्वर तालुक्याच्या वतीने “रिपब्लिकन पॅंथर सन्मान सोहळा २०२६” उत्साहात संपन्न! बोरजाईवाडी येथे भव्य मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर संपन्न; महिलांसाठी मॅमोग्राफी व विविध चाचण्या मोफत आम्ही पुस्तक प्रेमी समूहाचे निमंत्रितांचे साहित्य संमेलन रविवारी दिवसभर विविध साहित्यविषयक कार्यक्रमांची मेजवानी मुनव्वर हौसिंग सोसायटीचे नेतृत्व हरपले; कोंडीराम उर्फ बुवा आखाडे यांचे निधन महाबळेश्वर गाईड असोसिएशनचा स्तुत्य उपक्रम; १६० गाईड्ससाठी ड्रेस कोड लागू, पोलिस निरीक्षकांच्या हस्ते जॅकेट व कॅपचे वितरण सैनिक स्कूलमध्ये २६ नोव्हेंबरला होणाऱ्या भव्य एअर शोचे काटेकोर नियोजन करावे- जिल्हाधिकारी संतोष पाटील
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महाबळेश्वर तालुक्याच्या वतीने “रिपब्लिकन पॅंथर सन्मान सोहळा २०२६” उत्साहात संपन्न!

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महाबळेश्वर तालुक्याच्या वतीने “रिपब्लिकन पॅंथर सन्मान सोहळा २०२६” उत्साहात संपन्न!

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महाबळेश्वर तालुक्याच्या वतीने “रिपब्लिकन पॅंथर सन्मान सोहळा २०२६” उत्साहात संपन्न!

पाचगणी प्रतिनिधी –रिपब्लिकन चळवळ, समाज आणि शोषितांच्या हक्कासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या, तसेच महाबळेश्वर तालुक्यात पक्षाचा पाया मजबूत करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या व जुन्या दलित पॅंथर्सच्या त्यागाचा व सामाजिक योगदानाचा गौरव करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महाबळेश्वर तालुक्याच्या वतीने “रिपब्लिकन पॅंथर सन्मान सोहळा २०२६” मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. या विशेष गौरव सोहळ्यात अनेक आजी-माजी पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावून सोहळ्याची शोभा वाढवली.

या कार्यक्रमाला रिपब्लिकन चळवळीतील अनेक दिग्गज नेते व पदाधिकारी उपस्थित होते.यामध्ये प्रामुख्याने स्वप्निल गायकवाड (वाई पंचायत समिती सदस्य तथा आर.पी.आय युथ पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष)  दिलीपभाऊ बगाडे (लोकनियुक्त नगराध्यक्ष, पाचगणी नगरपालिका)  जोशनाताई सरतापे (महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष, सातारा)  मिथुन तळवळकर (उद्योजक आघाडी जिल्हा अध्यक्ष, सातारा)  प्रतीक गायकवाड (युथ जिल्हा अध्यक्ष, सातारा)  सुप्रियाताई माने (पाचगणी नगरसेविका)  

स्वातीताई कांबळे (पाचगणी नगरसेविका)  प्रियंकाताई वायदंडे (महाबळेश्वर नगरसेविका) ,निलेश गाडे (कामगार आघाडी जिल्हा अध्यक्ष, सातारा) ,नितीन भाऊ आवळे (पर्यावरण जिल्हा अध्यक्ष, सातारा)  शशिकांत जाधव (जिल्हा उपाध्यक्ष, सातारा)  राजेंद्र जगताप (जिल्हा नेते, सातारा),आप्पा तुपे (सातारा तालुका अध्यक्ष) श्रीकांत निकाळजे (वाई तालुका अध्यक्ष) तसेच ​नारायण शेठ बिरामने (नगरसेवक), राजेंद्र पारठे (नगरसेवक), अमित कांबळे (नगरसेवक) आणि गणेश कासुर्डे (नगरसेवक) यांनी या कार्यक्रमाला भेट देऊन आयोजकांचे व उपस्थितांचे अभिनंदन केले.

या कार्यक्रमादरम्यान रिपब्लिकन पक्षाच्या विचारांवर विश्वास ठेवून सीमा सपकाळ आणि किरण चव्हाण या महिलांनी जाहीर पक्षप्रवेश केला. तसेच, कार्तिक इम्मन यांच्या नेतृत्वाखाली अनेक विद्यार्थ्यांनी ‘विद्यार्थी आघाडी’मध्ये उत्साहात पक्षप्रवेश केला, ज्यामुळे पक्षाची स्थानिक पातळीवरील युवा फळी अधिक मजबूत झाली आहे.

ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या गौरवार्थ आणि पक्षाच्या विस्तारासाठी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या भव्य सोहळ्याचे संपूर्ण श्रेय आणि यशस्वी आयोजन केल्याबद्दल महाबळेश्वर तालुका अध्यक्ष जॉन जोसेफ आणि महाबळेश्वर तालुका कार्याध्यक्ष पप्पू भोसले यांचे उपस्थित सर्व मान्यवरांनी व नागरिकांनी भरभरून कौतुक केले. या यशस्वी सोहळ्यामुळे महाबळेश्वर तालुक्यात आर.पी.आय. आठवले गटाची पकड आणखी मजबूत झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.यावेळी प्रीती आंब्राळे , विशाल कांबळे, चंद्रकांत ईम्मन, सागर गोळे, कृष्णा घाडगे, हनुमंत घाडगे यांचे विशेष सहकार्य लाभले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महाबळेश्वर तालुक्याच्या वतीने “रिपब्लिकन पॅंथर सन्मान सोहळा २०२६” उत्साहात संपन्न!

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महाबळेश्वर तालुक्याच्या वतीने “रिपब्लिकन पॅंथर सन्मान सोहळा २०२६” उत्साहात संपन्न! पाचगणी प्रतिनिधी –रिपब्लिकन चळवळ,

Live Cricket