रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महाबळेश्वर तालुक्याच्या वतीने “रिपब्लिकन पॅंथर सन्मान सोहळा २०२६” उत्साहात संपन्न! बोरजाईवाडी येथे भव्य मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर संपन्न; महिलांसाठी मॅमोग्राफी व विविध चाचण्या मोफत आम्ही पुस्तक प्रेमी समूहाचे निमंत्रितांचे साहित्य संमेलन रविवारी दिवसभर विविध साहित्यविषयक कार्यक्रमांची मेजवानी मुनव्वर हौसिंग सोसायटीचे नेतृत्व हरपले; कोंडीराम उर्फ बुवा आखाडे यांचे निधन महाबळेश्वर गाईड असोसिएशनचा स्तुत्य उपक्रम; १६० गाईड्ससाठी ड्रेस कोड लागू, पोलिस निरीक्षकांच्या हस्ते जॅकेट व कॅपचे वितरण सैनिक स्कूलमध्ये २६ नोव्हेंबरला होणाऱ्या भव्य एअर शोचे काटेकोर नियोजन करावे- जिल्हाधिकारी संतोष पाटील
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » बोरजाईवाडी येथे भव्य मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर संपन्न; महिलांसाठी मॅमोग्राफी व विविध चाचण्या मोफत

बोरजाईवाडी येथे भव्य मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर संपन्न; महिलांसाठी मॅमोग्राफी व विविध चाचण्या मोफत

बोरजाईवाडी येथे भव्य मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर संपन्न; महिलांसाठी मॅमोग्राफी व विविध चाचण्या मोफत.

बोरजाईवाडी येथे ग्रामस्थांसाठी भव्य मोफत आरोग्य आणि नेत्र रोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देत विविध गंभीर आजारांचे निदान आणि महत्त्वाच्या रक्त चाचण्या मोफत करण्यात आल्या, ज्याला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या शिबिरामध्ये कृष्णा हॉस्पिटल, कराड यांच्या विशेष युनिटतर्फे महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी मॅमोग्राफी तपासणी पूर्णपणे मोफत करण्यात आली. ग्रामीण भागातील महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाविषयी जनजागृती व्हावी आणि वेळेत निदान व्हावे, या उद्देशाने कृष्णा हॉस्पिटलने केलेले हे सहकार्य कौतुकास्पद ठरले.

महिलांच्या इतर आरोग्य समस्यांवर मात करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल, सातारा येथील तज्ज्ञ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. साधना कवारे आणि त्यांच्या टीमने उपस्थित राहून महिलांची सखोल वैद्यकीय तपासणी केली आणि वैद्यकीय सल्ला दिला. या शिबिरामध्ये किन्हई प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) आणि येथील सहकाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले.

तसेच, महिलांच्या अंतर्गत आरोग्याचा अंदाज घेण्यासाठी श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक सेंटर यांच्या वतीने स्त्रियांचे हिमोग्लोबिन, कॅल्शियम, क्रिएटिनिन यांसह इतर अत्यंत महत्त्वाच्या लॅब चाचण्या मोफत करण्यात आल्या.महिलांच्या आरोग्य तपासणीसोबतच गावातील सर्व आबालवृद्धांसाठी अग्रवाल हॉस्पिटल यांच्या वतीने नेत्र रोग तपासणी शिबिर अत्यंत उत्तम रित्या पार पाडण्यात आले. यामध्ये अनेकांच्या डोळ्यांची तपासणी करून त्यांना पुढील उपचारांचे मार्गदर्शन करण्यात आले.ग्रामपंचायत बोरजावाडी तसेच बोरजाईदेवी ट्रस्ट यांच्यामार्फत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

बोरजाईवाडी गावामध्ये एकाच छताखाली एवढ्या मोठ्या आरोग्य सुविधा मोफत मिळाल्यामुळे सर्व ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आणि सर्व संबंधित रुग्णालयांचे, डॉक्टरांचे व तंत्रज्ञांचे मनःपूर्वक आभार मानले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महाबळेश्वर तालुक्याच्या वतीने “रिपब्लिकन पॅंथर सन्मान सोहळा २०२६” उत्साहात संपन्न!

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महाबळेश्वर तालुक्याच्या वतीने “रिपब्लिकन पॅंथर सन्मान सोहळा २०२६” उत्साहात संपन्न! पाचगणी प्रतिनिधी –रिपब्लिकन चळवळ,

Live Cricket