रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महाबळेश्वर तालुक्याच्या वतीने “रिपब्लिकन पॅंथर सन्मान सोहळा २०२६” उत्साहात संपन्न! बोरजाईवाडी येथे भव्य मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर संपन्न; महिलांसाठी मॅमोग्राफी व विविध चाचण्या मोफत आम्ही पुस्तक प्रेमी समूहाचे निमंत्रितांचे साहित्य संमेलन रविवारी दिवसभर विविध साहित्यविषयक कार्यक्रमांची मेजवानी मुनव्वर हौसिंग सोसायटीचे नेतृत्व हरपले; कोंडीराम उर्फ बुवा आखाडे यांचे निधन महाबळेश्वर गाईड असोसिएशनचा स्तुत्य उपक्रम; १६० गाईड्ससाठी ड्रेस कोड लागू, पोलिस निरीक्षकांच्या हस्ते जॅकेट व कॅपचे वितरण सैनिक स्कूलमध्ये २६ नोव्हेंबरला होणाऱ्या भव्य एअर शोचे काटेकोर नियोजन करावे- जिल्हाधिकारी संतोष पाटील
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » साहित्यिक ग्रंथसंपदा » आम्ही पुस्तक प्रेमी समूहाचे निमंत्रितांचे साहित्य संमेलन रविवारी दिवसभर विविध साहित्यविषयक कार्यक्रमांची मेजवानी

आम्ही पुस्तक प्रेमी समूहाचे निमंत्रितांचे साहित्य संमेलन रविवारी दिवसभर विविध साहित्यविषयक कार्यक्रमांची मेजवानी

आम्ही पुस्तक प्रेमी समूहाचे निमंत्रितांचे साहित्य संमेलन रविवारी दिवसभर विविध साहित्यविषयक कार्यक्रमांची मेजवानी

सातारा-येथील आम्ही पुस्तक प्रेमी समूह यांच्यातर्फे चतुर्थ साहित्य संमेलन वाचनातून समृद्धी या संकल्पनेखाली रविवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ ते संध्याकाळी सहा या कालावधीमध्ये हॉटेल निवांत यवतेश्वर येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती आम्ही पुस्तक प्रेमी समूहाचे डॉक्टर संदीप श्रोत्री,शिरीष चिटणीस, श्रीराम नानल, विनोद कुलकर्णी, मुकुंद फडके व श्रीकांत कात्रे यांनी दिली. या साहित्य संमेलनाचे उद्घाटक ज्येष्ठ पत्रकार अभिजीत बेल्हेकर असणार असून अध्यक्षस्थानी लेखक आणि राजहंस प्रकाशनाचे संपादक डॉक्टर सदानंद बोरसे असणार आहेत.हे संमेलन फक्त निमंत्रितांसाठी आणि आम्ही पुस्तकप्रेमी समूहाच्या सदस्यांसाठी आहे.समळेलस्थळ प्रा शिवाजीराव भोसले साहित्यनगरी नाव देण्यात आले असून व्यासपीठाला मधू नेने यांचे नाव देण्यात आले आहे 

या संमेलनामध्ये समूह सदस्यांचे कवी संमेलन तसेच, साहित्यातील शंभरी पार केलेले साहित्यिक प्रा शिवाजीराव भोसले, नारायण सुर्वे, सुनीताबाई देशपांडे, रवींद्र पिंगे, शंकर पाटील, द मा मिरासदार आणि व्यंकटेश माडगूळकर यांच्याविषयी विशेष कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. तसेच वाचन संस्कृती पुस्तकातून स्क्रीनकडे या विषयावर विशेष परिसंवादाचे आयोजनही करण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महाबळेश्वर तालुक्याच्या वतीने “रिपब्लिकन पॅंथर सन्मान सोहळा २०२६” उत्साहात संपन्न!

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महाबळेश्वर तालुक्याच्या वतीने “रिपब्लिकन पॅंथर सन्मान सोहळा २०२६” उत्साहात संपन्न! पाचगणी प्रतिनिधी –रिपब्लिकन चळवळ,

Live Cricket