Home » Uncategorized » मुनव्वर हौसिंग सोसायटीचे नेतृत्व हरपले; कोंडीराम उर्फ बुवा आखाडे यांचे निधन

मुनव्वर हौसिंग सोसायटीचे नेतृत्व हरपले; कोंडीराम उर्फ बुवा आखाडे यांचे निधन

मुनव्वर हौसिंग सोसायटीचे नेतृत्व हरपले; कोंडीराम उर्फ बुवा आखाडे यांचे निधन

महाबळेश्वर : महाबळेश्वरच्या सामाजिक, सहकार आणि धार्मिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे, मुनव्वर हौसिंग सोसायटीचे विद्यमान चेअरमन तथा महाबळेश्वर तालुका वारकरी संघटना आणि टॅक्सी युनियनचे ज्येष्ठ संचालक कोंडीराम उर्फ बुवा शंकर आखाडे (वय ६१) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने मुनव्वर हौसिंग सोसायटीने केवळ आपला चेअरमनच नव्हे, तर एक अनुभवी, कर्तव्यदक्ष आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व गमावले आहे.

बुवा आखाडे यांनी आपल्या कार्यकाळात मुनव्वर हौसिंग सोसायटीच्या माध्यमातून सभासदांशी जिव्हाळ्याचे संबंध जपले. तसेच जन्नीमाता गोटेनिरा पथ संस्थेचे संचालक, टॅक्सी युनियनचे संचालक आणि तालुका वारकरी संघटनेचे ज्येष्ठ पदाधिकारी म्हणून त्यांनी विविध क्षेत्रांत योगदान दिले. धार्मिक विचार, सामाजिक बांधिलकी आणि माणसे जोडण्याची त्यांची हातोटी यामुळे त्यांनी अनेकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते.

त्यांच्या स्वभावातील आपुलकी, मनमिळाऊपणा आणि प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची वृत्ती यामुळे ते सर्वपरिचित होते. सोसायटीच्या कामकाजात मार्गदर्शन करणारा, अडचणीच्या वेळी धीर देणारा आणि सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेणारा माणूस आज हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

त्यांच्या निधनाची बातमी समजताच महाबळेश्वर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. बुवा आखाडे यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून न निघणारी आहे. त्यांच्या आठवणी, सामाजिक कार्य आणि माणुसकीचा वारसा कायम स्मरणात राहील. भावपूर्ण श्रद्धांजली!

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

मुनव्वर हौसिंग सोसायटीचे नेतृत्व हरपले; कोंडीराम उर्फ बुवा आखाडे यांचे निधन

मुनव्वर हौसिंग सोसायटीचे नेतृत्व हरपले; कोंडीराम उर्फ बुवा आखाडे यांचे निधन महाबळेश्वर : महाबळेश्वरच्या सामाजिक, सहकार आणि धार्मिक क्षेत्रात आपल्या

Live Cricket