Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » एसआयआर’ला पुन्हा मुदतवाढ, १३ नोव्हेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करता येणार

एसआयआर’ला पुन्हा मुदतवाढ, १३ नोव्हेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करता येणार

‘एसआयआर’ला पुन्हा मुदतवाढ, १३ नोव्हेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करता येणार

मुंबई :राज्यात सुरु असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेला भारत निवडणूक आयोगाने चौथ्यांदा मुदतवाढ दिली आहे. राज्यात राबविण्यात येत असलेल्या मतदार याद्यांची विशेष सखोल तपासणी(एसआयआर) मोहिमेंतर्गत नवमतदारांसह प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांना आपले नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी यापूर्वी २६ ऑक्टोबर पर्यंत मुदत होती. ती आता वाढविण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात मतदार याद्यांची विशेष सखोल तपासणी मोहिम राबविली जात आहे. ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत यापूर्वीच्या मतदार यादीतील २ कोटी मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. या मतदारांना पुन्हा मतदार यादीत नावे नोंदविण्यासाठी तीन वेळा संधी देण्यात आली असून त्याची मुदत २६ऑक्टोबर ला संपली होती. या मुदतीत १२ लाख १४ हजार ७१३ मतदारांनी नमुना-६ मध्ये अर्ज दाखल केले आहेत. मतदार यादीतील नोंदींमध्ये दुरुस्तीसाठी ६ लाख २ हजार १९९ मतदारांनी अर्ज नमुना-८ मध्ये, तर नावे वगळण्यासाठी ६२ हजार ६७२ अर्ज नमुना-७ मध्ये अर्ज दाखल केले आहेत.आयोगाकडे एकूण१८लाख ७९हजार५८४ हरकती,सूचना आणि नव्याने मतदार नोंदणी अर्ज दाखल झाले आहेत.

मात्र राज्यातील अजूनही लाखो मतदार मतदार यादीत नाव नोंदण्यापासून वचिंत राहण्याची शक्यता होती. त्याची दखल घेत मतदार यादीतील नावांबाबतचे दावे आणि हरकती दाखल करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. तसेच दावे आणि हरकतींच्या नोटीस टप्प्यातील कार्यवाही व त्यांचा निपटारा करण्यासाठी २५ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली असून, अंतिम मतदार यादी ३० नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार, दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी १३ नोव्हेंबर २०२६ असा असेल. नोटीस टप्पा आणि दावे-हरकतींचा निपटारा ३१ ऑगस्ट ते २५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर ३० नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल.

महाराष्ट्रासह १९ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये १ ऑक्टोबर २०२६ ही पात्रता तारीख निश्चित करून विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रिया राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रात ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. मतदारांना आपले नाव, तपशील तसेच मतदार यादीतील नोंदी तपासून आवश्यक दावे व हरकती दाखल करण्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर गाईड असोसिएशनचा स्तुत्य उपक्रम; १६० गाईड्ससाठी ड्रेस कोड लागू, पोलिस निरीक्षकांच्या हस्ते जॅकेट व कॅपचे वितरण

महाबळेश्वर गाईड असोसिएशनचा स्तुत्य उपक्रम; १६० गाईड्ससाठी ड्रेस कोड लागू, पोलिस निरीक्षकांच्या हस्ते जॅकेट व कॅपचे वितरण ​महाबळेश्वर :पर्यटननगरी महाबळेश्वरमध्ये

Live Cricket