Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » अनुसुचित जाती-जमातीच्या शेतकऱ्यांसाठी विशेष पंधरवडा मोहीम

अनुसुचित जाती-जमातीच्या शेतकऱ्यांसाठी विशेष पंधरवडा मोहीम

अनुसुचित जाती-जमातीच्या शेतकऱ्यांसाठी विशेष पंधरवडा मोहीम

सातारा : सातारा जिल्हा हा नियंत्रित वातावरणातील शेती, सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर तसेच विविध फळपिके आणि भाजीपाला पिकांची लागवड, उत्पादन व निर्यातीमध्ये राज्यातील आघाडीचा जिल्हा आहे. फलोद्यान क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी कृषी विभागामार्फत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजना राबविण्यात येत असून, याद्वारे बेरोजगार तरुणांकरिता रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत. 

या योजनांच्या माध्यमातून काढणीपश्चात व्यवस्थापन घटकांतर्गत फळे पिकावण्यासाठी रायपनिंग चेंबर, पूर्वशीतकरण गृह, प्राथमिक/फिरते प्रक्रिया केंद्र, शीतगृह व शीतवाहन उभारणीसाठी सहाय्य दिले जाते. तसेच फलोत्पादन यांत्रिकीकरण अंतर्गत ट्रॅक्टर, पॉवर टिलर, पीक संरक्षण औजारे, शेततळे अस्तरीकरण, सामूहिक तलाव योजना, हरितगृह, शेडनेट हाऊस, मल्चिंग व कांदा चाळ उभारणी केली जाते. क्षेत्र विस्तार घटकांतर्गत आले, हळद, ड्रॅगन फ्रूट, ब्ल्यूबेरी लागवड, तसेच डाळिंब पिकासाठी ॲन्टी हेलनेट आणि द्राक्ष पिकाकरिता क्रॉप कव्हर इत्यादी बाबींचा लाभ सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना देण्यात येतो.

ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन या योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी (DBT) पोर्टलवरील https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करताना जमीन मालकीचा ७/१२, खाते उतारा, ओळखपत्र (आधार कार्ड), आधार संलग्न बँक खाते पासबुक आणि जातीचा दाखला ही कागदपत्रे अपलोड करावीत. योजनेबाबत अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

विशेष मोहीम योजनेतून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांचे अर्ज सादर करण्यासाठी दिनांक १ नोव्हेंबर २०२६ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत विशेष पंधरवडा मोहीम राबविण्यात येत आहे. तरी जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करून सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर गाईड असोसिएशनचा स्तुत्य उपक्रम; १६० गाईड्ससाठी ड्रेस कोड लागू, पोलिस निरीक्षकांच्या हस्ते जॅकेट व कॅपचे वितरण

महाबळेश्वर गाईड असोसिएशनचा स्तुत्य उपक्रम; १६० गाईड्ससाठी ड्रेस कोड लागू, पोलिस निरीक्षकांच्या हस्ते जॅकेट व कॅपचे वितरण ​महाबळेश्वर :पर्यटननगरी महाबळेश्वरमध्ये

Live Cricket