अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » सातारा जिल्हा बँकेत उमेदवारीसाठी वारस नोंद की निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी

सातारा जिल्हा बँकेत उमेदवारीसाठी वारस नोंद की निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी

सातारा जिल्हा बँकेत उमेदवारीसाठी वारस नोंद की निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी

सातारा (अजित जगताप) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा जिल्ह्याचे राजकारण हे सामान्य कार्यकर्त्यांसाठी मृगजळ ठरले आहे. दोन -चार कार्यकर्ते सोडले तर घराणेशाही वारस नोंदी याची परंपरा आहे. सातारा जिल्हा बँकेमध्ये दहा वर्षे पूर्ण झालेल्या संचालकांच्या वारसदार- नातेवाईक की निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी मिळणार? याकडे आता सामान्यांचे लक्ष लागले आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात २०११ ठराव झाले आहेत, ४०६ ठराव हुकले आहेत. सोनवणे हरकती व अंतिम मतदार यादी पूर्ण झाल्यानंतर मतदारांना अधिकार मिळणार आहे.                        

नव्या सहकार कायद्यानुसार सलग दहा वर्षे किंवा त्यापेक्षा जादा कार्यकाल पूर्ण करणाऱ्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकांना ही निवडणूक लढविता येणार नाही. त्यानुसार जिल्हा बँकेत सलग दहा वर्ष राज्य करणारे विद्यमान अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यसभा सदस्य खा. नितीन पाटील, उपाध्यक्ष तथा सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य अनिल देसाई, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, माजी आ. प्रभाकर घार्गे यांच्यासह दत्ता नाना ढमाळ, प्रदीप विधाते, राजेंद्र राजपुरे, कांचन साळुंखे यांच्यासह दिग्गजांना संचालक पदासाठी निवडणुकीत अर्ज दाखल करता येणार नाही.

मात्र, त्यांच्या जागेवर वारसदार-नातेवाईक की, निष्ठावंतांना संधी दिली जाणार? हा महत्त्वाचा प्रश्न उरला आहे. मागील अनुभव पाहता वारसदार- नातेवाईक यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तशा पद्धतीने फिल्डिंगही लावली जात आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणुकीचा फटाके दिवाळीतच फोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिन दिन दिवाळी… गाय – म्हशी ओवाळी.. याचा आतापासूनच वेध लागला आहे. 

निवडणूक कार्यक्रमाची अधिकृत अंतिम तारीख सहकार खात्याकडून जाहीर झालेली नाही. फक्त सोसायटी ठरावासाठी ढराव… डराव… सुरू झालेले आहे. विविध सोसायट्यांची मतदान प्रतिनिधी (ठराव) निश्चित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत प्राप्त झालेल्या सोसायटी प्रतिनिधी ठरावांची छाननी केली जाईल. त्यानंतर प्रारूप व अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून प्रत्यक्ष सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणूक व मतदानाचा सविस्तर कार्यक्रम घोषित केला जाईल.

यापूर्वीच अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त व संचार बंदीचे आदेश लागू झाली आहेत. सातारा जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये मोर्चेबांधणी आणि राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. आर्थिक निकषावर बांधणी करून पुन्हा एकदा तत्त्वज्ञान मांडले जाणार आहे.सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एकूण सभासद २,७१४ इतके आहेत. आगामी २०२६ च्या संचालक मंडळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा उपनिबंधकांकडे जवळपास१,८९४ ते २,०११ ठराव दाखल झाले आहेत . मागीलनिवडणुकीत अंतिम मतदारसंख्या १,७६४ ते १,९६४ दरम्यान होती. बँकेचे एकूण २७१४ सभासद आहेत . 

सातारा जिल्हा बँकेच्या ३१७ शाखा ,१० विभागीय कार्यालयामध्ये सध्या नेत्यांच्या ठरावासाठी काही राजकीय नेत्यांचे समर्थक अधिकारी व कर्मचारी सुद्धा गोपनीय रित्या ठरावाबाबत कामकाज करत आहे. त्याची साधी कुणकुण सहकार खात्याला नाही. याचे सुद्धा अनेकांना नवल वाटत आहे. जिल्हा बँक भरती प्रक्रियेच्या बाबत ज्यांच्या शिफारशी डावलेल्या जात आहेत. ते बंड करतील का थंड होतील? हे सुद्धा दिसून येणार आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत एस.सी., एस.टी., ओ.बी.सी. महिला प्रतिनिधी यांना मात्र बँकेच्या अभ्यासपूर्ण कामकाजापेक्षाही नेत्यांची मर्जी महत्त्वाची ठरते. त्यामुळे नेते सांगे व संबंधित काही संचालक बोले हीच परिस्थिती आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket