अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या प्रयत्नांना यश; संपर्क तुटलेल्या १०५ गावांना एसटीची मोठी दिलासादायक भेट

नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या प्रयत्नांना यश; संपर्क तुटलेल्या १०५ गावांना एसटीची मोठी दिलासादायक भेट

महाबळेश्वर-तापोळा रस्ता खचल्यामुळे संपर्क तुटलेल्या १०५ गावांसाठी एसटी बस सेवा अखेर पूर्ववत! 

(नवीन वेळापत्रकासह)

महाबळेश्वर:महाबळेश्वर-तापोळा मुख्य रस्ता खचल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या भागातील १०५ गावांचा महाबळेश्वर तालुक्याशी संपर्क पूर्णपणे तुटला होता. रस्ता बंद असल्यामुळे शाळकरी विद्यार्थी, नोकरदार आणि सर्वसामान्य ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत होते. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी स्थानिक पदाधिकारी आणि समाजसेवकांनी तातडीने पावले उचलत प्रशासनाकडे यशस्वी पाठपुरावा केला. परिणामी, या भागातील एसटी बस सेवा अखेर पूर्ववत झाली असून आज, ४ ऑगस्ट २०२६ (मंगळवार) पासून नवीन वेळापत्रकानुसार बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.या समस्येचे गांभीर्य ओळखून १०५ गाव समाजाचे अध्यक्ष श्री. घनश्याम आपा सकपाळ, ४५ गाव समाजाचे अध्यक्ष श्री. आनंद दादा मुरडे, ३२ गाव समाजाचे अध्यक्ष श्री. धोंडिबा शेठ धनावडे, ज्येष्ठ समाजसेवक श्री. बाबुदादा सकपाळ, श्री. भाऊसाहेब मोरे, श्री. संपत भाऊ जाधव आणि श्री. कृष्णा कदम यांनी एकत्र येत महाबळेश्वरचे नगराध्यक्ष श्री. सुनील शिंदे व मुख्याधिकारी योगेश पाटील व संजय जंगम यांची भेट घेतली व त्यांना सविस्तर निवेदन दिले.

यानंतर नगराध्यक्ष श्री. सुनील शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाबळेश्वर आगर (ST) प्रमुख श्री. जाधव साहेब यांच्यासोबत एक तातडीची व सकारात्मक बैठक घेण्यात आली. या संयुक्त बैठकीत प्रशासनाने तात्काळ निर्णय घेत या दुर्गम भागातील एसटी बस सेवा पुन्हा सुरळीत केली आहे.एसटी बसचे नवीन अधिकृत वेळापत्रक:प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी दिवसातून एकूण ३ फेऱ्यांचे नियोजन केले आहे:पहिली फेरी (सकाळी):तापोळा येथून सकाळी ०७:३० वाजता सुटेल आणि ०८:३० वाजता महाबळेश्वरला पोहचेल.महाबळेश्वर येथून सकाळी ०९:३० वाजता सुटेल आणि १०:३० वाजता तापोळा येथे पोहचेल.दुसरी फेरी (दुपारी):तापोळा येथून सकाळी ११:३० वाजता सुटेल आणि दुपारी १२:३० वाजता महाबळेश्वरला पोहचेल.महाबळेश्वर येथून दुपारी ०२:०० वाजता सुटेल आणि दुपारी ०३:०० वाजता तापोळा येथे पोहचेल.तिसरी फेरी (संध्याकाळी):तापोळा येथून संध्याकाळी ०५:०० वाजता सुटेल आणि संध्याकाळी ०६:०० वाजता महाबळेश्वरला पोहचेल.महाबळेश्वर येथून संध्याकाळी ०६:३० वाजता सुटेल आणि रात्री ०७:३० वाजता तापोळा येथे पोहचेल.विशेष नोंद: रात्रीच्या शेवटच्या फेरीनंतर बसचा रात्रीचा मुक्काम तापोळा येथेच राहील, ज्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी पहिली फेरी वेळेवर सुटू शकेल.सर्व प्रमुख पदाधिकारी, समाजसेवक आणि नगराध्यक्ष यांच्या या यशस्वी पाठपुराव्यामुळे दुर्गम भागातील हजारो ग्रामस्थांना, विद्यार्थ्यांना आणि नोकरदारांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket