अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » बँकिंग » सातारा जिल्ह्यात 53,736 शेतकऱ्यांना 569 कोटींची कर्जमाफी; 2 लाख शेतकऱ्यांची 1,068 कोटींची वीज थकबाकीही माफ

सातारा जिल्ह्यात 53,736 शेतकऱ्यांना 569 कोटींची कर्जमाफी; 2 लाख शेतकऱ्यांची 1,068 कोटींची वीज थकबाकीही माफ 

सातारा जिल्ह्यात 53,736 शेतकऱ्यांना 569 कोटींची कर्जमाफी; 2 लाख शेतकऱ्यांची 1,068 कोटींची वीज थकबाकीही माफ 

सातारा (प्रतिनिधी) : राज्य सरकारच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’ अंतर्गत सातारा जिल्ह्यातील 53 हजार 736 खातेदार शेतकऱ्यांना 569 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार असून ही रक्कम थेट डीबीटी (Direct Benefit Transfer) द्वारे वितरित केली जाणार आहे. तसेच 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपधारक शेतकऱ्यांची वीज थकबाकी माफ करण्याच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील सुमारे दोन लाख शेतकऱ्यांना 1,068 कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे.

ही माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि भाजप किसान मोर्चाचे रामकृष्ण वेताळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी भाजपचे गटनेते अविनाश कदम व विकास गोसावी उपस्थित होते.

रविंद्र चव्हाण म्हणाले राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार 585 कोटी रुपयांचा लाभ या योजनेतून मिळणार असल्याचे सांगण्यात आले. यापूर्वीच्या कर्जमाफी योजनांमधील काही अटी शिथिल करून, दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असली तरी दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पूर्वीच्या योजनेतील 50 हजार रुपयांची मर्यादा आणि नियमित कर्जफेडीची अटही रद्द करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही दिलासा देणाऱ्या विविध घोषणांसह 7.5 एचपीपर्यंतच्या कृषी वीजपंपांची सुमारे 48 हजार कोटी रुपयांची जुनी वीज थकबाकी माफ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या थकीत वीजबिलाचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार असल्याचा दावा करण्यात आला.

राज्य सरकार शेतीसाठी दरवर्षी सुमारे 95 हजार कोटी रुपयांचा खर्च करत असून, जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, सौर कृषीवाहिनी, सौरपंप आणि नदीजोड प्रकल्पांसारख्या योजनांद्वारे शेती अधिक शाश्वत व सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. पुढील काळात दिवसा वीजपुरवठा शंभर टक्के करण्याबरोबरच दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सिंचन प्रकल्प हाती घेण्यात येणार असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket