अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शेत शिवार » पर्जन्यमापक यंत्र बंद, टँकरही बंद; मानेवाडीतील पाणीटंचाई गंभीर

पर्जन्यमापक यंत्र बंद, टँकरही बंद; मानेवाडीतील पाणीटंचाई गंभीर

पर्जन्यमापक यंत्र बंद, टँकरही बंद; मानेवाडीतील पाणीटंचाई गंभीर

ऐन पावसाळ्यात मानेवाडी ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती, ,हंडाभर पाण्यासाठी दीड किलोमीटर वर पायपीट करावी लागत असल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले असून शासनाने बंद केलेला पाणी टँकर तातडीने सुरू करावा अशी मागणी करत आहेत,.

मानेवाडी तालुका फलटण गावात ऐन पावसाळ्यात तीव्र पाणीटंचाई झालेली असून गावातील ग्रामपंचायतच्या नळ पाणीपुरवठ्याच्या विहिरीने तळ गाठलेला असून परिसरात असणाऱ्या विहिरींना पाणी नसल्याने तसेच गावात टंचाई व्यतिरिक्त काळामध्ये सुरू असणारे चार हात पंप यांनाही पाणी हापसून उपसणे बंद झालेले आहे.

परिणामी गावात असणाऱ्या असणाऱ्या ग्रामस्थ व गाई ,बैल ,शेळी, म्हैस व मेंढरे यांना पाण्यासाठी दीड किलोमीटर वरून पायपीट करून पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामस्थांना रोजची जीवनावश्यक कामे बाजूला ठेवून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, शासनाच्या वतीने 11 जून रोजी पहिला पाणी टँकर सुरू झाला, मात्र जुलै महिन्यात पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरू झाला त्या अनुषंगाने शासनाच्या वतीने 5 जुलै रोजी मानेवाडी सुरू असणारा टँकर बंद करण्यात आला.

मानेवाडी गावात पर्जन्यमापक यंत्र आहे मात्र ते बंद पडलेले आहे त्यामुळे या गावात व परिसरात किती मिलिमीटर पाऊस झालेला आहे याबाबत शासनाकडे माहिती उपलब्ध नसल्याने या मंडल परिसरात पडलेल्या पावसावरच या गावाला गृहीत धरल्यामुळे गावचा पाणी टँकर शासनाच्या वतीने बंद करण्यात आला असून तातडीने सुरू करावा अशी मागणी सरपंच राजेंद्र जाधव यांनी केली आहे. याबाबत तहसीलदार अभिजीत जाधव यांच्याशी पावसाळा सुरू होणे आधी तालुक्यातील नऊ गावात पाणी टँकर ने पाणी पुरवठा सुरू होता. या नऊ गावासह मानेवाडीतील पाणी टंचाई संबंधाने संपर्क साधला असता मानेवाडी गावात भेट देऊन गाव व परिसरात पाणी उपलब्ध नसल्याची माहिती घेऊन वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून पाणी टँकर सुरू करण्यात येईल असे सांगितले,तर उपसरपंच मच्छिंद्र कदम यांनी गावातील पर्जन्यमापक यंत्र बंद असल्याने शासनाकडे योग्य ती माहिती उपलब्ध झाली नसल्याने ग्रामस्थ यांना पाणी टंचाई चा सामना करावा लागत आहे तातडीने अचूक पर्जन्यमापक यंत्र बसवून पाऊसाची योग्य नोंद शासनाने ठेवावी अशी मागणी केली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket