अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » Uncategorized » क्राईम डायरी » दारू पार्टीतील किरकोळ वादातून युवकाचा खून; चौघांना अटक

दारू पार्टीतील किरकोळ वादातून युवकाचा खून; चौघांना अटक

दारू पार्टीतील किरकोळ वादातून युवकाचा खून; चौघांना अटक

पाचगणी प्रतिनिधी : महाबळेश्वर तालुक्यातील भोसे येथे दारू पार्टीदरम्यान झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान थेट खुनात झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पाचगणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इंदापूर (जि. पुणे) येथील अक्षय रमेश जाधव (वय २५) हा आपल्या मित्रांसह महाबळेश्वर तालुक्यातील भोसे येथे आला होता. बुधवारी (दि. ८) रात्री सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास हॉटेल अँड लॉजमध्ये दारू पार्टी सुरू असताना काही कारणावरून त्यांच्यात वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, अक्षय जाधव याच्यावर लाकडी काठी व दगडाने बेदम मारहाण करण्यात आली.

या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या अक्षय जाधव याला प्रथम पाचगणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी वाई आणि नंतर बारामती येथे हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी विशाल अजित जाधव (वय ३०, रा. बोरी, ता. इंदापूर, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाचगणी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम १०३(१) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :

१) सूर्यकांत चंद्रकांत गोळे (रा. भोसे, ता. महाबळेश्वर)२) अविनाश सतीश भोसले (रा. बावधन, ता. वाई)३) राहुल जनार्दन राजपुरे (रा. कणूर, ता. वाई)४) अमोल गोपाळ वाडकर (रा. खिवली, ता. वाई)

या घटनेमुळे महाबळेश्वर तालुक्यात खळबळ उडाली असून पुढील तपास सपोनि डी. जी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पाचगणी पोलीस करीत आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket