अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » २३ जून ‘एकल महिला दिवस’ म्हणून साजरा करा; स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्देश एकल महिलांच्या सन्मानासाठी ग्रामसभा ठराव करणार-मंत्री आदिती तटकरे

२३ जून ‘एकल महिला दिवस’ म्हणून साजरा करा; स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्देश एकल महिलांच्या सन्मानासाठी ग्रामसभा ठराव करणार-मंत्री आदिती तटकरे

२३ जून ‘एकल महिला दिवस’ म्हणून साजरा करा; स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्देश एकल महिलांच्या सन्मानासाठी ग्रामसभा ठराव करणार-मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. १८ : संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेला २३ जून हा ‘आंतरराष्ट्रीय विधवा दिन’ राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत आणि ग्रामपंचायतींमध्ये ‘एकल महिला दिवस’ म्हणून साजरा करण्यात यावा, यावेळी गावातील किंवा शहरातील सर्व एकल महिलांना सन्मानाने या कार्यक्रमाला निमंत्रित करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत. एकल महिलांच्या सन्मानासाठी ग्रामपंचायतींमध्ये ठराव करण्यात यावा, असेही त्या म्हणाल्या.

राज्य शासनामार्फत एकल महिला धोरण तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून या पार्श्वभूमीवर एकल महिलांच्या समस्या, अपेक्षा आणि त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.

बैठकीस महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, आयुक्त माधवी सरदेशमुख, आयुक्त डॉ. जगदीश मणियार (दूरदृश्य प्रणालीद्वारे), सहसचिव वी. आर. ठाकूर, अवर सचिव सुनील सरदार, प्रसाद कुलकर्णी, सह आयुक्त वर्षा पवार, उपायुक्त संगीता लोंढे, विजय क्षीरसागर, जामसिंग गिरासे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, महिला व बाल विकास विभाग महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्यरत आहे. बालकांच्या जन्मनोंदणीवेळी वडिलांसोबत आईचे नाव नोंदविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय विभागाने घेतला आहे; तसेच समाजातील कालबाह्य रूढी-परंपरा दूर करण्यासाठी आदिशक्ती अभियानाच्या माध्यमातून ग्रामस्तरावर जनजागृती आणि प्रबोधनाचे उपक्रम राबविण्यात येत आहेत.

राज्यात ‘विधवा’ या शब्दाऐवजी ‘एकल महिला’ ही सन्मानजनक संज्ञा वापरण्यात यावी; तसेच, गाव अथवा शहरामध्ये एकल महिलांना रूढी-परंपरांच्या आधारावर अपमानास्पद वागणूक दिली जाणार नाही, याबाबत ग्रामसभा अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत ठराव मंजूर करण्यात यावा. तसेच, या कार्यक्रमानिमित्त राज्य शासनाच्या प्रस्तावित एकल महिला धोरणामध्ये कोणत्या बाबींचा समावेश असावा याविषयी महिलांची मते, सूचना आणि अपेक्षा जाणून घेऊन त्या शासनाकडे पाठवण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

मंत्री तटकरे म्हणाल्या की, या कार्यक्रमाद्वारे एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि प्रशासकीय अडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यासाठी; तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी स्थानिक प्रशासनाने पुढाकार घ्यावा.

कार्यक्रमामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी केलेल्या कार्याची माहिती द्यावी, रोजगार, स्वयंरोजगार आणि उपजीविकेच्या संधींबाबत चर्चा करून, बचत गटात नसलेल्या महिलांना बचत गटांमध्ये समाविष्ट करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत.

या उपक्रमामुळे शासकीय योजनांची माहिती आणि त्यांचा लाभ अधिक प्रभावीपणे एकल महिलांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. तसेच समाजात एकल महिलांना सन्मानपूर्वक व समानतेची वागणूक मिळावी यासाठी जनजागृती होऊन त्यांचे सक्षमीकरण करण्यास हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket