अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शेत शिवार » यशस्वी खरीप हंगामासाठी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब आवश्यक ‘दिलखुलास’ कार्यक्रमात कृषी उपसंचालक नामदेव परीट यांचे मार्गदर्शन

यशस्वी खरीप हंगामासाठी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब आवश्यक ‘दिलखुलास’ कार्यक्रमात कृषी उपसंचालक नामदेव परीट यांचे मार्गदर्शन

यशस्वी खरीप हंगामासाठी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब आवश्यक ‘दिलखुलास’ कार्यक्रमात कृषी उपसंचालक नामदेव परीट यांचे मार्गदर्शन

मुंबई: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात कोल्हापूर जिल्ह्याचे कृषी उपसंचालक नामदेव परीट यांची ‘खरीप हंगाम विशेष’ मुलाखत प्रसारित होणार आहे. यामध्ये खरीप हंगामाची पूर्वतयारी, बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पीक नियोजन, प्रमाणित बियाण्यांची निवड, संतुलित खत व्यवस्थापन, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर तसेच कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांविषयी ते सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत गुरुवार, १८ जून आणि शुक्रवार, १९ जून २०२६ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरुन प्रसारित होणार आहे. तसेच हा कार्यक्रम ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवरही ऐकता येणार आहे. ही मुलाखत कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयाच्या सहायक संचालक वृषाली पाटील यांनी घेतली आहे.

 खरीप हंगामात अधिक उत्पादन आणि शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्यांनी कोणत्या बाबींना प्राधान्य द्यावे, याबाबतही परीट मार्गदर्शन करणार आहेत. तसेच प्रमुख पिकांच्या लागवडीवेळी घ्यावयाची काळजी आणि हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहितीही या मुलाखतीतून दिली जाणार आहे.

मुलाखतीमध्ये यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी कोणत्या बाबींवर विशेष भर द्यावा तसेच हवामान बदलाच्या आव्हानांमध्ये शाश्वत शेतीसाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत श्री.परीट यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून मार्गदर्शन केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket