अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » देश » पश्चिम बंगालमध्ये चार हजार ईव्हीएम खाक

पश्चिम बंगालमध्ये चार हजार ईव्हीएम खाक

पश्चिम बंगालमध्ये चार हजार ईव्हीएम खाक

 पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत वापरण्यात आलेले 4 हजार ईव्हीएम आगीमध्ये जळून खाक झाली आहेत. कोलकातामधील एका सरकारी इमारतीत ही ईव्हीएम ठेवण्यात आली होती. या घटनेनंतर तृणमूल काँग्रेस, काँग्रेस आणि ‘आप’ने संशय व्यक्त केला असून, निवडणुकीत झालेल्या मतघोटाळ्याचे पुरावे नष्ट केल्याचा आरोप होत आहे. 

दक्षिण कोलकाता येथील अलीपूर भागातील नऊ मजली सरकारी इमारतीत ही ईव्हीएम ठेवण्यात आली होती. ही मशीन्स पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत 10 विधानसभा मतदारसंघांमध्ये वापरण्यात आली होती. हे सर्व ईव्हीएम जळून खाक झाले आहेत. इमारतीत दक्षिण 24 परगणा जिल्हा परिषदेसह इतर सरकारी कार्यालयेदेखील होती. आग लागल्यानंतर 24 तासांनंतरही अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवता आले नव्हते. आगीच्या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. इमारत पूर्णपणे सील करण्यात आली असून फॉरेन्सिक तपास सुरू करण्यात आला आहे.

4 हजार कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट यंत्रे जळून खाक झाली आहेत. गूढरीत्या ईव्हीएम नष्ट झाले आहेत, असा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. तर आगीबद्दल मोदी सरकार, भाजप आणि निवडणूक आयोगाने उत्तर द्यावे, अशी मागणी काँग्रेस आणि ‘आप’ने केली आहे. विशेष म्हणजे, पश्चिम बंगाल सरकारचे मंत्री कौशिक चौधरी यांनीही आगीच्या घटनेत घातपात वाटत असल्याचे म्हटले आहे.

या आगीवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीत वापरण्यात आलेले ईव्हीएम नवव्या मजल्यावर होते. आग दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर लागली. मधल्या कुठल्याही मजल्यांना धोका न पोहोचता आग थेट नवव्या आणि दहाव्या मजल्यांवर कशी पोहोचली, असा संशय मंत्री कौशिक चौधरी यांनीच व्यक्त केला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket