अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » प्रशासकीय » ग्रामपंचायतींमध्ये आपले सेवा केंद्र सुरू करा- जिल्हाधिकारी संतोष पाटील

ग्रामपंचायतींमध्ये आपले सेवा केंद्र सुरू करा- जिल्हाधिकारी संतोष पाटील

ग्रामपंचायतींमध्ये आपले सेवा केंद्र सुरू करा– जिल्हाधिकारी संतोष पाटील

सातारा दि. 1 : सातारा जिल्ह्यात एकूण एक हजार पाचशे ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी एकोणसाठ ग्रामपंचायतींमध्येच आपले सेवा केंद्र सुरु आहेत. उर्वरित ग्रामपंचायतींमध्ये लवकरात लवकर आपले सेवा केंद्र सुरु करुन नागरिकांना गावातच विविध दाखले उपलब्ध करुन द्यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.  

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी विविध विभागांच्या विविध कामांचा आढावा घेतला. या बैठकीला पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे दूरदृष्य प्रणालीद्वारे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत थोरात उपस्थित होते.

ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी काढाचे अद्याप राहिले आहेत अशा शेतकऱ्यांचे फार्मर आयडी कृषी विभागाने तात्काळ काढावेत, अशा सूचना करुन जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, जिल्ह्यातील धरणांमधील उपलब्ध पाणी साठ्याचे आत्तापासूनच नियोजन करा. यामध्ये पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे. धरणांमधील पाणी कमी झाल्याने धरणांमधील गाळ काढण्यासाठी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी.

जनगणनेच्या कामाबाबत बोलताना जिल्हाधिकारी श्री पाटील यांनी स्पष्ट केले की, घरोघरी जाऊन केली जाणारी घरांची गणना अत्यंत अचूक आणि निश्चित केलेल्या मुदतीतच पूर्ण झाली पाहिजे. सर्व पर्यवेक्षकांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन या सर्व बाबींची काटेकोरपणे पडताळणी करावी. ज्या मतदारांचे मॅपिंग अद्याप बाकी आहे, अशा राहिलेल्या सर्व व्यक्तींचे मॅपिंग लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. मतदार मॅपिंगचा वेग आणि टक्का वाढवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावेत. या दोन्ही कामांचा वेळोवेळी आढावा घ्यावा.

सेवा हमी कायद्यांतर्गत प्रत्येक विभागाने आपली सेवा वेळेत देण्याबाबत खरबदारी घ्यावी. कार्यालय हे सौर उर्जेवर आणण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 14 कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने संबंधित विभागाने कार्यवाही करावी तसेच जनसुविधा व नागरि सुविधांच्या कामांना गती द्यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी दिल्या.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket