पश्चिम बंगालचे तृणमूल सरकार बरखास्त
पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे सरकार बरखास्त करण्यात आले आहे. विधानसभेचा कार्यकाळ संपल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल आर. एन. रवी यांनी आज हा निर्णय घेतला. बंगालच्या ‘लोकभवन’मधून यासंदर्भातील पत्रक प्रसिद्ध करण्यात आले.
बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूलचा पराभव झाला. मात्र हा पराभव जनतेने केला नसून भाजप आणि निवडणूक आयोगाने षड्यंत्र रचून केला आहे. त्यामुळे मी स्वतःहून राजीनामा देणार नाही. तुम्हाला जे काही करायचे आहे ते करा, अशी भूमिका ममतांनी घेतली होती. त्यांच्या या भूमिकेमुळे विधानसभा बरखास्त करणे हा पर्याय राज्यपालांपुढे होता. गुरुवार, 7 मे रोजी विधानसभेचा कार्यकाळ संपताच राज्यपालांनी सरकार बरखास्त केले. त्यामुळे नव्या सरकारच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.




