रोहोट परिमंडळात सेवा हमी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी; ग्रामस्थांमध्ये समाधान
सातारा -रोहोट परिमंडळ मध्ये वनपाल राजाराम काशीद यांनी महाराष्ट्र लोक सेवा हमी कायदा 2015 ची प्रभावी अंमलबजावणी करत आहेत. रोहोट परिमंडळ मधील नियतक्षेत्र रोहोट, खडगाव, धावली या बिट मधील 19 गावात पीक नुकसानी, पशुहानी, मानव व वन्यजीव प्रकरण, मालकी वृक्ष तोड प्रकरण, पर्यटन क्षेत्र यामध्ये महाराष्ट्र लोक सेवा हमी कायदा 2015ची चांगल्या प्रकारे वापर होताना दिसत आहे लोक सहभागातून वन विकास या प्रमाणे वन विभाग काम करत आहे.
स्थानिक जनतेला बरोबर घेऊन वन विभाग काम करत आहे. लोकाभिमुख प्रशासन चालवायचे असेल तर स्थानिक प्रशासना ची साथ आसने खूप गरजेचे आहे रोहोट परीमंडळ मध्ये राजाराम काशीद यांनी पीक नुकसानी प्रकरण चा तात्काळ निपटारा, पशुहानी प्रकरण मध्ये तात्काळ जागेवर जाऊन पंचनामे मानव हानी प्रकरण मध्ये तात्काळ पंचनामे तसेच सतत ग्रामस्थ यांचे संपर्कात राहणे ग्रामस्थ यांचा सतत मिटिंग घेऊन वन विभाग विषयी प्रश्न स्थानिक पातळीवर सोडवणे यामुळे राजाराम काशीद यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सेवा हमी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत आहे आणि ग्रामस्थ यांचे कडून समाधान व्यक्त होत आहे .
लोक सहभाग असेल तर प्रशासन गतिमान होऊ शकते ग्रामस्थ यांच्या सतत मिटिंग घेऊन मानव व वन्यजीव संघर्ष कमी केला जात आहे- राजाराम काशीद वनपाल रोहोट




