उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वाई ची आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय आर्थिक प्रगती
वाई : सातारा जिल्ह्यातील अग्रगण्य पतसंस्था म्हणून ओळख असलेल्या उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वाई ने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. संस्थेला यावर्षी ₹1 कोटी 61 लाख इतका निव्वळ नफा झाला आहे. दिनांक 31 मार्च 2026 अखेर संस्थेच्या एकूण ठेवी ₹150.25 कोटी तर कर्जे ₹130 कोटी इतकी असून, ₹280.25 कोटींचा एकत्रित व्यवसाय संस्थेने साध्य केला आहे. विशेष म्हणजे, संस्थेच्या सर्व 10 शाखा नफ्यात असून सातत्यपूर्ण प्रगतीचा आदर्श संस्थेने निर्माण केला आहे.
संस्थेची एकूण गुंतवणूक ₹51 कोटी 15 लाख असून, उत्कर्ष लिक्विडिटी प्रोटेक्शन स्कीम अंतर्गत संस्थेच्या 99.92% ठेवीदारांच्या प्रत्येकी 48 लाख रुपयापर्यंतच्या ठेवी सुरक्षित असून यामुळे ठेवीदारांचा संस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाला असलेचे संस्थेच्या अध्यक्ष मा.श्रीमती अनुराधा आनंद कोल्हापुरे यांनी सांगितले. मागील वर्षाच्या तुलनेत संस्थेने भरीव वाढ नोंदवली असून, ठेवींमध्ये ₹28 कोटी व कर्जामध्ये ₹35 कोटी अशी मिळून ₹63 कोटींच्या व्यवसायाची वाढ साध्य करण्यात आली आहे.
याशिवाय, संस्थेचे भागभांडवल ₹8 कोटी 25 लाख तर एकूण निधी ₹23 कोटी 88 लाख इतका असून, संस्थेचे CRAR चे प्रमाण 22% इतके मजबूत आहे. तसेच, CRR व SLR चे प्रमाण आदर्श स्तरावर राखण्यात आले आहे, ज्यामुळे संस्थेची आर्थिक स्थैर्य व सुरक्षितता अधोरेखित होते.
संस्थेच्या या यशामागे उपाध्यक्ष ॲड. रमेश यादव संचालक श्री अमर कोल्हापुरे, श्री. मदन साळवेकर, डॉ. मंगला अहिवळे, श्री. श्रीकांत शिंदे, श्री. शरद चव्हाण, श्री. सलीमभाई बागवान, श्री. संजय वाईकर, श्री. सागर मुळे, श्री. वैभव फुले, श्री. भूषण तारू, श्रीमती नीला कुलकर्णी, श्रीमती अलका घाडगे यांचे योग्य मार्गदर्शन, अधिकारी व कर्मचारी तसेच दैनंदिन ठेव प्रतिनिधि यांचे परिश्रम तसेच सभासद व ठेवीदारांचा विश्वास कारणीभूत आहे.

संस्था सद्यस्थिती मध्ये QR Code, Mobile Banking, Whatsapp Banking, RTGS, NEFT, IMPS, जेष्ठ नागरिक यांना घरपोच सेवा अशा सुविधा पुरवीत असून भविष्यातही आधुनिक सुविधा व ग्राहकाभिमुख सेवा देत प्रगतीचा वेग कायम ठेवणार असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती अनुराधा कोल्हापुरे यांनी सांगितले.




