सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त येवती येथे शिवतेज सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंती निमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर व भव्य लेझीम पथकाचा कार्यक्रम  प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे कामकाज आदर्शवत वर्धापन दिनी जिल्हा परिषद अध्यक्षा मा.डॉ.सौ. प्रियाताई शिंदे यांची सदिच्छा भेट केळघर येथे उद्या महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन श्रीक्षेत्र पार्वतीपूर पारसोंड येथे आदिशक्ती श्रीरामवरदायिनी मातेचा यात्रोत्सव; सोळाव्या वर्षीही विविध सामाजिक व क्रीडा स्पर्धांचा जागर!
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » कराड तालुक्यात स्मार्ट मीटरला तीव्र विरोध

कराड तालुक्यात स्मार्ट मीटरला तीव्र विरोध

कराड तालुक्यात स्मार्ट मीटरला तीव्र विरोध

अनेक गावांचे सरपंच एकवटले; रस्त्यावर उतरण्याचा महावितरणला दिला इशारा, सुपने-तांबवे गटातील ग्रामस्थ आक्रमक

कराड प्रतिनिधी( ज्ञानेश्वर शेवाळे)-कराड तालुक्यातील सुपने तांबवे जिल्हा परिषद गटातील सुमारे २० ते २५ गावांमध्ये महावितरण कंपनीकडून बसविण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरला ग्रामस्थांकडून तीव्र विरोध सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक ग्रामपंचायतींनी ठराव मंजूर करून गावांमध्ये स्मार्ट मीटर बसवू नयेत, अशी भूमिका घेतली असून, गावकऱ्यांच्या वतीने महावितरणच्या कराड (ओगलेवाडी) येथील विभागीय कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे.

म्होत्रे, भोळेवाडी, साजूर, तांबवे, डेळेवाडी, वसंतगड, आबईनगर, सुपने, केसे, वारंजी, मुंढे यांसह सुमारे २० ते २५ गावांतील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी एकत्र येत महावितरणच्या अधिकाऱ्यांना आपला तीव्र विरोध नोंदवला. ग्रामस्थांच्या मते स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीजबिल वाढण्याची शक्यता असून, त्याचा आर्थिक फटका सामान्य नागरिकांना बसू शकतो. त्यामुळे गावांमध्ये स्मार्ट मीटर बसवण्यापूर्वी प्रशासनाने ग्रामपंचायतींशी चर्चा करून ग्रामस्थांची संमती घ्यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

यासंदर्भात अनेक ग्रामपंचायतींनी अधिकृत ठराव मंजूर केले असून, त्या ठरावाची प्रतही महावितरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. ग्रामपंचायतींच्या ठरावाकडे दुर्लक्ष करून संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी यांनी मनमानी पद्धतीने गावांमध्ये स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न करू नये, असेही ग्रामस्थांनी स्पष्टपणे बजावले आहे.

दरम्यान, गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या प्रश्नावर महावितरण प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढत असून, प्रशासनाने त्वरित या विषयात हस्तक्षेप करून स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया थांबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

गावकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाले किंवा ग्रामस्थांच्या विरोधाला न जुमानता स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर सर्व गावकरी एकत्र येऊन तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा देण्यात आला आहे. आवश्यक असल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची तयारीही ग्रामस्थांनी दर्शवली आहे.

यावेळी उपस्थित सरपंच व ग्रामस्थांनी, ग्रामस्थांच्या हिताचा विचार न करता स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय लादण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला जोरदार विरोध केला जाईल असे बजावले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी सातारा वनपरिक्षेत्रातील ग्रामस्थांची बैठक सातारा प्रतिनिधी -अधिकारी

Live Cricket