निवडणुकांची रणधुमाळी; चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर
नवी दिल्ली-पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम या राज्यांमध्ये आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. निवडणूक आयोगाने या राज्ये-केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुका रविवारी जाहीर केल्या. तमिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीमध्ये एका टप्प्यात, तर पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. ४ मे रोजी या निवडणुकांचा निकाल लागणार आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन चार राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशाच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. निवडणुका जाहीर झाल्यानंतर या राज्ये-केंद्रशासित प्रदेशात आचारसंहिता लागू झाली. निवडणुका हिंसाचार आणि प्रलोभनापासून मुक्त असाव्यात. आचारसंहिता आणि नियमांचे उल्लंघन करणार्यांविरोधात निवडणूक आयोग कठोर कारवाई करेल, असा इशारा कुमार यांनी दिला.
२९४ पश्चिम बंगाल-मतदान : २३,२९ एप्रिल
१२६ आसाम- मतदान : ९ एप्रिल
३३पुद्दुचेरी- मतदान : ९ एप्रिल
१४० केरळ- मतदान : ९ एप्रिल
२३४ तमिळनाडू-मतदान : २३ एप्रिल
४ मे-मतमोजणी




