अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » सौर ऊर्जेतून शाश्वत भविष्य घडवण्याकडे महाराष्ट्राची वाटचाल

सौर ऊर्जेतून शाश्वत भविष्य घडवण्याकडे महाराष्ट्राची वाटचाल

सौर ऊर्जेतून शाश्वत भविष्य घडवण्याकडे महाराष्ट्राची वाटचाल

नागपूर -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपूर येथे वारी ग्रुपच्या 10 गिगावॅट इंटिग्रेटेड सोलर इंगॉट अँड वेफर मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीचे भूमिपूजन करण्यात आले. दावोस येथे वारी ग्रुपसमवेत झालेल्या सामंजस्य करारानंतर विक्रमी वेळेत नागपूर येथे या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, स्वच्छ ऊर्जा हा आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाचा विषय असून भारत या क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारताने 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे लक्ष्य निश्चित केले असून त्यातील अनेक उद्दिष्टे यशस्वीपणे साध्य केली आहेत. त्यामुळे सर्वसमावेशक हरित ऊर्जा संक्रमणाला गती मिळत आहे. त्यातूनच आज ऊर्जा संक्रमण आणि स्वच्छ ऊर्जेच्या क्षेत्रात भारत जगातील सर्वात वेगाने प्रगती करणाऱ्या देशांपैकी एक ठरत असून विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये भारत ऊर्जा संक्रमणात जगात सर्वात पुढे आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र शासनाने ऊर्जा परिवर्तन हाती घेतले आहे. याअंतर्गत सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने’द्वारे राज्यातील शेतकऱ्यांना लागणारी सुमारे 16,000 मेगावॅट वीज देण्यासाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यात आली असून जगातील सर्वात मोठ्या डिस्ट्रिब्युटेड सोलर प्रकल्पांपैकी एक असा ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ प्रकल्प सुरू केला आहे.

त्या माध्यमातून 5000 मेगावॅट वीज निर्मिती होत असून, वर्षाखेरीस ही क्षमता 14,000 मेगावॅटपर्यंत नेण्याचे लक्ष्य आहे.यावेळी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल व इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket