अॅट्रोसिटी कायद्यात महत्त्वाचा बदल; आता एफआयआर दाखल होताच अटक नाही, चौकशीनंतरच कारवाई
अॅट्रोसिटी कायद्याचा पूर्वी गैरवापर होत असे, त्यामुळे या कायद्यात महत्त्वाचे बदल करण्यात आले असून आता एफआयआर दाखल झाल्यावर तातडीने अटक न करता आधी समितीमार्फत चौकशी होईल आणि गुन्हा सिद्ध झाला तरच अटक केली जाईल.
अॅट्रोसिटी कायद्याचा पूर्वी गैरवापर होत असे, त्यामुळे या कायद्यात महत्त्वाचे बदल करण्यात आले असून आता एफआयआर दाखल झाल्यावर तातडीने अटक न करता आधी समितीमार्फत चौकशी होईल आणि गुन्हा सिद्ध झाला तरच अटक केली जाईल, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री तथा शिवसेना (शिंदे गट) नेते संजय शिरसाट यांनी विधानपरिषदेत दिली. कोणावरही विनाकारण अन्याय होऊ नये, हा या बदलामागील उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पूर्वी काय होते?
शिरसाट यांनी विधानपरिषदेत बोलताना सांगितले की, पूर्वी अॅट्रोसिटीचे गुन्हे सर्रासपणे दाखल केले जायचे. एखाद्याने शिवी दिली असे म्हणून जरी पोलीस ठाण्यात गेले तरी आरोपीवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल व्हायचा. गुन्हा दाखल झाल्यावर २४ तासांच्या आत अटक करण्याचा नियमही होता आणि त्यानुसार काही ठिकाणी अटकाही व्हायच्या. या कायद्याचा काही प्रमाणात गैरवापर झाल्याचे नाकारता येत नाही, हे शिरसाट यांनी मान्य केले.




