अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » Uncategorized » इंग्लंडला नमवत भारत सलग दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये!

इंग्लंडला नमवत भारत सलग दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये!

इंग्लंडला नमवत भारत सलग दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये!

भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील दुसऱ्या सेमी फायनलचा सामना भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये पार पडला. 

हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या मैदानावर दोन्ही डावात मोठी धावसंख्या होते. पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने २५३ धावांचा डोंगर उभारला होता. इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी आणि फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी विक्रमी २५४ धावांचा यशस्वी पाठलाग करायचा होता. या धावांचा पाठलाग करताना जेकब बेथल आणि विल जॅक्सने पूर्ण जोर लावला. पण भारतीय संघाने हा सामना ७ धावांनी जिंकून फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी २५४ धावा करायच्या होत्या. त्यामुळे इंग्लंडला चांगल्या सुरूवातीची गरज होती. पण इंग्लंडला सुरूवातीलाच मोठा धक्का बसला. फिल सॉल्ट अवघ्या ५ धावा करून माघारी परतला. जोस बटलरने काही आकर्षक फटके मारले. पण तो २५ धावांवर बाद होऊन माघारी परतला. कर्णधार हॅरी ब्रुकही अवघ्या ७ धावांवर बाद झाला. टॉम बँटम १७ धावांवर माघारी परतला. शेवटी जेकब बेथल आणि विल जॅक्सने मिळून इंग्लंडचा डाव सांभाळला. दोघांनी मिळून इंग्लंडला विजयाच्या जवळ पोहोचवलं. विल जॅक्स ३५ धावा करून माघारी परतला. पण बेथलने दमदार शतकी खेळी केली आणि इंग्लंडला विजयाच्या अगदी जवळ पोहोचवलं. पण इंग्लंडचा थोडक्यात पराभव झाला.

या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाला प्रथम फलंदाजीच हवी होती. भारताकडून अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनची जोडी डावाची सुरूवात करण्यासाठी मैदानात आली. अभिषेक शर्मा या डावात अवघ्या ९ धावा करून माघारी परतला. त्यानंतर संजू सॅमसन आणि इशान किशनच्या जोडीने मिळून डाव सांभाळला. दोघांनी मिळून ९६ धावांची भागीदारी केली. यादरम्यान संजू सॅमसनने ८९ धावांची भागीदारी केली. तर इशान किशनने ३९ धावांची दमदार खेळी केली. त्यानंतर शिवम दुबेने ४३ धावा केल्या. कर्णधार सूर्यकुमार यादव ११ धावांवर माघारी परतला. तर हार्दिक पांड्याने २७ धावांची खेळी केली. तर तिलक वर्माने २१ धावांची खेळी करून संघाची धावसंख्या ७ गडी बाद २५३ धावांवर पोहोचवली.

भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये

भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना फायनलमध्ये प्रवेश केला होता. फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला नमवून जेतेपदाचा मान पटकावला होता. यावेळी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळताना भारताने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी भारतीय संघाचा सामना न्यूझीलंडविरूद्ध होणार आहे.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket