ओबीसी,मागासवर्गीय समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आर्थिक व राजकीय अस्तित्वासाठी मागासवर्गीय मतदारांनी मागासवर्गीय उमेदवारांना मतदान करावे.” सुरेश कोरडे.
सातारा -ओबीसी, भटके विमुक्त,विषेश मागास प्रवर्ग,बी.सी., मागासवर्गीय समाजातील मतदार नागरिकांनी आपल्या भावी पिढ्यांच्या संविधानिक न्याय हक्कांचे संरक्षण करण्यासाठी राजकीय मतपेटीची लढाई लढणाऱ्या मागासवर्गीय उमेदवारांना मतदान करावे. तरच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून घेता येईल. विषेशत: नागरिकांचा मागास प्रवर्ग मतदार संघातून मुळ ओबीसींच्या ऐवजी बोगस कुणबी जातीचे दाखले मिळवून निवडणूकीत उमेदवारी करणाऱ्या उमेदवारांना मागासवर्गीय मतदार नागरिकांनी मतदान करू नये असे आवाहन ओबीसी बहुजन आघाडीचे सातारा जिल्हाध्यक्ष सुरेश कोरडे यांनी ओबीसी समाजाच्या आयोजित बैठकीत केले.
यावेळी बोलताना ओबीसी जनमोर्चाचे सातारा जिल्हाध्यक्ष भरत लोकरे म्हणाले “ओबीसींच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रामध्ये हिस्सेदारी अधोरेखित करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लढवणाऱ्या मुळ ओबीसी उमेदवारांना मागासवर्गीय नागरिकांनी मतदान करावे. एकुण लोकसंख्येच्या पंच्याहत्तर टक्के लोकसंख्या असलेल्या समाजांना सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व राजकीय दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सर्वच मागासवर्गीय मतदारांनी एकत्र येऊन मतपेटीची लढाई लढाईला साथ द्यावी.”
ओबीसी नेते सुनील क्षिरसागर यांनी “ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी मतपेटीची लढाई आवश्यक असल्याने सर्वांनी एकत्रित येऊन सर्व सत्ता ताब्यात घेऊन समाजाची प्रगती करावी शासन व्यवस्थेमध्ये मूळ ओबीसी व मागासवर्गीय यांना स्थान मिळालेच पाहिजे यासाठी मागासवर्गीय समाजाने एकजूट दाखवावी” असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सर्वश्री पंडित परीट,सचिन सुतार,चंद्रकांत कोवळे, एकनाथ कुंभार, नामदेव सुतार, किशोर लिमकर,शौकत शिगावे, विजय घारे, दत्तात्रेय सातार्डेकर, शामराव खोतआदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी सर्वश्री अजय अकोलकर, सुनील महाडेश्वर, अनिल खडके, सुखदेव सुतार, सचिन लोहार, विनायक परीट, संजय भालकर, दिलीप गवळी,सुनील सावर्डेकर सुनील विभुते, संजय लोहार, सतीश सुतार, अनिल सुतार, सागर भोसले, संभाजी भोसले आदींच्या कार्यकर्ते उपस्थित होते.




